अनेक प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजन हवे असते. त्यासाठी ते ओटीटीवर प्रदर्शित होणाऱ्या सीरिजची वाट पाहात असतात. काही महिन्यांपूर्वी ओटीटीवर पंचायत ३, मिर्झापूर ३, कोटा फॅक्टरी ३, गुल्लक ४ या सीरिज प्रदर्शित झाल्या आणि प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरल्या. तसेच या यादीमध्ये ब्रिंदा या सीरिजचा देखील समावेश आहे. आता आणखी एक सस्पेंस थ्रिलर सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सीरिजचे नाव '1000 Babies' असे आहे. नुकताच या सीरिजचा अंगावर शहारे आणणारा टीझर प्रदर्शित झाला आहे.
'1000 Babies' या सीरजची जेव्हा पासून घोषणा झाली तेव्हा पासून चर्चा सुरु होती. या सीरिजचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. टीझरमध्ये जीर्ण वस्त्र घातलेल्या, पांढरे केस मोकळे सोडलेल्या नीना गुप्ता दिसत आहेत. त्या घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहेत. काही वेळाने बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. त्यानंतर एका हॉस्पिटलमध्ये महिला बाळाला जन्म देत आहे. इथे टीझर आणखी रंजक होतो. हॉस्पिटलमधील नर्स त्या बाळाला कडेवर घेऊन काही तरी रहस्यमयी हालचाली करताना दिसते. काही वेळाने पोलीस येतात आणि नेमकं काय सुरु आहे हे पाहण्यासाठी जंगलात जातात.
नीना गुप्ता यांचा भयानक अवतार
'1000 Babies' या वेब सीरिजच्या टीझरमध्ये नीना गुप्ता यांचा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. या केवळ ५८ सेकंदाचा टीझर नीना गुप्ता यांच्या लूकमुळे भयानक वाटू लागतो. हा टीझर पाहाताना अंगवार अक्षरश: शहारे येतात. टीझरपाहून सीरिजमध्ये लहान मुलांशी संबंधीत काही तर रहस्यमय घटना पाहायला मिळणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच नीना गुप्ता नेमकी कोणती भूमिका साकारत आहेत याचा देखील नेटकरी अंदाज बांधताना दिसत आहेत. पण त्यांना या सीरिजच्या प्रदर्शनाची वाट पाहावी लागणार आहे.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश
'1000 Babies' या सीरिजचा टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सर्वजण या सीरिजची आतुरतेने वाट पाहात आहेत. ही सीरिज डिझ्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या सीरिजमधये नीना यांच्यासोबत आणखी कोणते कलाकार दिसणार आणि ही सीरिज नेमकी काय कखा सांगणार हे पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.