चित्रपट निर्माते आणि लेखक प्रीतीश नंदी यांचे काल, ८ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. प्रीतीश नंदी यांच्या निधनाच्या बातमीवर नीना गुप्ता यांनी दिलेली प्रतिक्रिया चांगलीच व्हायरल होत आहे. अनुपम खेर यांनी दु:ख व्यक्त करणारी पोस्ट केली होती. त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये काही कमेंट्स आल्या ज्या खूप चकीत करणाऱ्या होत्या. आता नेमकं काय झालं आहे? चला जाणून घेऊया...
अनुपम खेर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 'प्रिय मित्र प्रीतीश नंदी यांच्या निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. प्रीतीश नंदी यांनी मुंबईत सुरुवातीचे दिवस असताना खूप मदत केली' असे ते म्हणाले. पुढे अनुपम यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या पोस्टवर नीना यांनी कमेंट केली आहे. त्यांनी चक्क प्रीतीश नंदी यांना शिवी दिली आहे. पण ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल होताच नीना गुप्ता यांनी डिलिट केली आहे.
अनुपम खेर यांनी केलेल्या पोस्टवर नीना यांनी म्हटले की, 'मृत्यूनंतरही तुला शांती मिळणार नाही. या हरामखोराने माझ्यासोबत काय केले हे तुला माहित आहे का? त्याने माझ्या मुलीच्या जन्माचा दाखला चोरून प्रसिद्ध केला होता.' ही कमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ती डिलिट केली. तसेच नीना यांनी एका मित्राला पत्र लिहून प्रीतीश नंदीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ नयेत, असे सांगितले होते.
राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत नीना गुप्ता यांनी प्रीतीश नंदी यांचा उल्लेख केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, 'प्रीतीश नंदी यांनी पत्रकार असताना मसाबाचा जन्म दाखला चोरला होता. त्यांनी रजिस्ट्रार कार्यालयातून जन्म दाखला चोरला होता. मी त्यांना हरामखोर म्हणते. त्याने चो दाखला चोरला आणि कुणाला तरी पाठवला. मी तेव्हा माझ्या मावशीकडे राहात होते. त्यामुळे मी त्यांना विनंती केली तो दाखला देण्याची. त्यांनी मला आठवडाभरानंतर पुन्हा बोलावले होते. आठवडाभरानंतर मावशी आली तेव्हा ते म्हणाले, की कोणत्या तरी नातेवाईकाकडे दिला आहे. योगायोगाने प्रमाणपत्र घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला ओळखणाऱ्या व्यक्तीला मी ओळखत होतो. प्रितीशने कुणाला तरी पाठवून नंतर लेख लिहिल्याचे समोर आले.'
वाचा: आमिरने नकार दिलेल्या 'या' सिनेमाने संजयला बनवले रातोरात स्टार, १९९१मध्ये केली होती सर्वाधिक कमाई
मसाबाचे वडील वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्स होते. नीना गुप्ता यांना मसाबाचा जन्म लपवायचा होता. मात्र, हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर या विषयावर बरीच चर्चा रंगली होती. नीना आजतागायत हे विसरलेली नाही.
संबंधित बातम्या