अभिनेत्री नीलम कोठारी ही बॉलिवूडमधील एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. काही दिवसांपूर्वी नीलम ही नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'फॅब्युलस लाईव्ह्स व्हर्सेस बॉलिवूड वाइव्स' या सीरिजच्या नव्या सिझनमध्ये दिसली होती. या सीरिजला मिळालेल्या यशाचा आनंद नीलम सध्या घेत आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये तिने गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चांवर वक्तव्य केले आहे.
नीलमने नुकताच हॉटरफ्लायला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या कारकिर्दीबद्दल आणि इंडस्ट्रीत महिला अभिनेत्री असणे किती वेगळे होते याबद्दल सांगितले. तिच्यात आणि गोविंदामध्ये कोणताही 'लिंक-अप' नसल्याचे तिने स्पष्ट केले. खरं तर माध्यमांनीच त्यांना अधिक जोडलं. कारण त्यांनी एकमेकांसोबत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं.
मुलाखतीमध्ये नीलमला गोविंदासोबतच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच ऐकायला मिळाल्या होत्या असे म्हटले गेले . तेव्हा नीलमने तातडीने उत्तर दिले. "तसे नव्हते... मला वाटते की लिंक अप हा संपूर्ण खेळाचा भाग होता. स्पष्टीकरण देणारं कुणीच नव्हतं. त्यांना जे वाटेल ते त्यांनी छापले आणि खरे सांगायचे तर मला असे वाटते की त्या काळी आपण प्रेसला घाबरत होतो. कारण ती पेनाची ताकद होती आणि तो त्याचाच एक भाग होता. २-३ पेक्षा जास्त सिनेमे केले तरे आम्ही डेट करतो आहोत असे समजले गेले" असे नीलम म्हणाली.
नीलम ही ८० ते ९०च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. १९८५ मध्ये पदार्पण केल्यानंतर पुढील दशकात तिने ३० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले , ज्यात हम साथ साथ हैंसारख्या हिट चित्रपटांचा समावेश आहे . ९० च्या दशकाच्या उत्तरार्धात तिने आपल्या दागिन्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी चित्रपट सोडले. अलीकडेच प्रथम रिअॅलिटी शो फॅब्युलस लाइव्ह्स ऑफ बॉलिवूड वाइव्ज आणि नंतर मेड इन हेवनच्या एपिसोडद्वारे नीलमने शोबिझमध्ये पुनरागमन केले .
वाचा : कोणी पत्नीचे दागिने गहाण ठेवले तर कोणी राहते घर; कर्जात बुडाले होते 'हे' मराठी कलाकार, पण...
नीलमने काही वर्षे डेट केल्यानंतर २०११ मध्ये अभिनेता समीर सोनीसोबत लग्न केले. २०१३ मध्ये त्यांनी एका मुलीला दत्तक घेतलं आणि तिचं नाव अहाना ठेवलं.