Nawazuddin Siddiqui Wife Aaliya Receives Legal Notice: नवाजुद्दीन सिद्दीकीची माजी पत्नी आलिया सिद्दीकी देखील बॉलिवूडमध्ये चर्चेत आली आहे. ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये झळकल्यानंतर आलिया सिद्दीकी घराघरांत ओळखली जाऊ लागली आहे. आता तिचे नाव रोजच चर्चेत असते. आलिया सिद्दीकी आणि वादाचे तसे जुने नाते आहे. याच कारणामुळे यावेळी तिला ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये सहभागी होण्याची संधीही मिळाली. कधी प्रोफेशनल, तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे आलिया नेहमीच वादात अडकते. दरम्यान, आता दुबई सरकारने देखील आलिया सिद्दीकीला नोटीस पाठवल्याचे बातमी समोर आली आहे.
नवाजुद्दीन आणि आलिया सिद्दीकी यांची दोन्ही मुलं सध्या दुबईत आहेत. तिथेचा राहून ते त्यांचे शिक्षण पूर्ण करत आहेत. आलिया सिद्दीकीही तिच्या मुलांसोबत दुबईत राहते. मात्र, आता आलिया सिद्दीकीला परदेशात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, असे बोलले जात आहे. कारण, आता दुबई सरकारने तिला नोटीस पाठवली आहे.
७ सप्टेंबर रोजी दुबईच्या रेंटल डिस्प्युट सेंटरचे काही अधिकारी आलियाचे घर रिकामे करण्याची नोटीस घेऊन आले होते. घरभाडे न भरल्यामुळे आलिया सिद्दीकीला दुबई सरकारकडून घर रिकामे करण्याची नोटीस मिळाली आहे. या नोटीसमध्ये असे म्हटले गेले आहे की, ‘भाडे न भरल्यास, आलियाला २७,१८३ दिराम भाडे मूल्यासह सदरची मालमत्ता रिकामी करावी लागेल. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.’
आता बेघर होण्याच्या भीतीने आलिया दुबईतील भारतीय दूतावासाचे दरवाजे ठोठावणार असल्याचे बोलले जात आहे. आलिया सिद्दीकीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच 'बिग बॉस ओटीटी'मध्ये झळकली होती. त्यानंतर आता तिच्या करिअरला सुरुवात झाली आहे. आता तिच्याकडे अनेक प्रोजेक्ट्स आहेत, ज्यांच्या माध्यमातून ती पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या दरम्यान आता ती दुबईत तिच्यासमोर उभी राहिलेली हे समस्या सोडवू शकेल का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.