बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी हा कायमच चर्चेत असतो. मग त्याचा चित्रपट असो वा खासगी आयुष्य असो. कायमच तो चर्चेत असतो. लवकरच त्याचा 'सेक्शन १०८' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे तो जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. दरम्यान, एका मुलाखतीमध्ये त्याने व्यसनावर भाष्य केले आहे. त्याच्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नवाजने एका वृत्तावहिनीशी बोलताना सांगितले की दररोज व्यसन करायचा. थोडीशी दारु प्यायला तरी नशा चढते. होळीदरम्यान थंडाई प्यायल्यानंतर दोन दिवस त्यांची नशा उतरली नव्हती असे देखील तो म्हणाला होता.
वाचा: शाहरुख खानने अयोध्येत जाऊन घेतले प्रभू श्रीरामाचे दर्शन? काय Viral Video मागिल सत्य
नवाजुद्दीने 'समदीश अनफिल्टर्ड शो'मध्ये एनएसडीतील मधील किस्सा शेअर केला आहे. "होळी हा माझ्या आवडीचा सण आहे. कारण त्यावेळी थंडाई प्यायला मिळते. एनएसडीमध्ये असताना मी पहिल्यांदा थंडाई प्यायलो होतो. स्वानंद किरकिरे या मित्राने मला थंडाई पाजली आणि मी पितच गेलो. त्यानंतर काही वेळ माझ्यासोबत काय घडत आहे हे मला कळत नव्हते. दोन दिवस नशा उतरली नव्हती. दारू प्यायल्यानंतर मी महान अभिनेता आहे, असे मला वाटते. गांजा घेतल्यानंतर मला छान वाटते. खूप मजा येते. त्यानंतर मी गाणे गायला सुरुवात करतो" असे नवाज म्हणाला.
नवाजने आजवर अनेक भूमिका केल्या आहेत. त्याच्या काही भूमिका विशेष गाजल्या. संघर्षाविषयी बोलताना नवाज म्हणाला, "मी एक गुणी अभिनेता आहे हे सिद्ध करण्यासाठी १०-१२ वर्ष लागली आहेत. पण हा संघर्ष कायम राहणार आहे. आता कुठे लोक माझे काम आणि मला स्वीकारायला लागले आहेत."