मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  मेहंदीच्या सोहळ्यात लाईट्स गेल्या अन् लीला झाली गायब! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये नवा ट्वीस्ट

मेहंदीच्या सोहळ्यात लाईट्स गेल्या अन् लीला झाली गायब! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये नवा ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 29, 2024 06:42 PM IST

मेहंदीच्या क्षणी साळुंके त्याच्या आणि लीलाच्या लग्नाची पत्रिका प्रोजेक्टरवर दाखवणार इतक्यातच संपूर्ण जहागीरदार घरातील लाईट्सच गेल्या आहेत.

मेहंदीच्या सोहळ्यात लाईट्स गेल्या अन् लीला झाली गायब! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये नवा ट्वीस्ट
मेहंदीच्या सोहळ्यात लाईट्स गेल्या अन् लीला झाली गायब! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये नवा ट्वीस्ट

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत आता चांगलाच गोंधळ पाहायला मिळणार आहे. अभिराम जहागीरच्या घरी सध्या मेहंदीचा सोहळा रंगणार आहे. मात्र, अजूनही लीलाला लग्न करायचं नाही. लीला आणि अभिरामचं लग्न होऊ नये म्हणून दुर्गा देखील एक प्लॅन आखत आहे. दुर्गाच्या या प्लॅनमध्ये लीला स्वतः देखील सामील झाली आहे. तर, दुसरीकडे विक्रांत याने साळुंकेला हाताशी धरून एक नवा प्लॅन सुरू केला आहे. अभिरामने तुरुंगात धाडल्यामुळे चिडलेला साळुंके आता त्याचा बदला घेण्यासाठी हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, विक्रांत याने साळुंकेला तुरुंगातून बाहेर काढून, त्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. आता साळुंके वेश बदलून अभिराम आणि लीला यांच्या मेहंदी सोहळ्यात वेटरच काम करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

विक्रांतने त्याला दिलेल्या आयडियानुसार आता मेहंदीच्या क्षणी साळुंके त्याच्या आणि लीलाच्या लग्नाची पत्रिका प्रोजेक्टरवर दाखवणार इतक्यातच संपूर्ण जहागीरदार घरातील लाईट्सच गेल्या आहेत. या लाईट स्वतःहून गेलेल्या नसून, यामागे दुर्गाचा प्लॅन आहे. दुर्गाने आयत्यावेळी सगळ्या लाईट घालवून लीला पळवण्याचा प्लान केला होता. दुर्गाच्या प्लाननुसार एक गाडी पार्किंगमध्ये लीलाची वाट पहात थांबली होती. मात्र, दुर्गाचा हा प्लॅन साळुंकेला आधीच कळला आणि त्याने दुर्गाच्या माणसाला बेशुद्ध करून आपल्या माणसाला लीला किडनॅप करण्यास सांगितले.

चैतन्य-अर्जुन आणि सायलीचं ’ठरलं तर मग’; साक्षीच्या नाटकाचा मिळून शेवट करणार! मालिकेत येणार रंजक वळण

साळुंके करणार लीलाला किडनॅप!

दुसरीकडे ही गाडी आणि हा माणूस दुर्गाची असल्याचे समजून, लीलाने देखील स्वतःच गाडीत उडी घेत ड्रायव्हरला गाडी सुरू करण्यास सांगितले. आता एजेच्या घरातील लाईट परत आले आहेत. मात्र, लीला कुठेच दिसत नसल्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. तर, दुर्गाने सांगितल्याप्रमाणे तिथे काही बायका लीला पळून गेली, अशी बोंब करायला सुरुवात करतात. तिथे लीला या गाडीत बसली असली तरी, ही गाडी साळुंकेने लीलाला किडनॅप करण्यासाठी पाठवल्याचे तिला कळले नाहीये. त्यामुळे आता लीला पुरती अडकणार आहे.

अभिराम लीलाला शोधू शकेल?

दुसरीकडे, भर साखरपुड्यातून लीला पळून गेल्याचे कळताच, अभिराम देखील चिडला आहे. मात्र, लीला पळून जाऊ शकत नाही आणि अशी जर ती पळून गेली असेल, तर माझ्या इतका वाईट कोणी नाही, असं म्हणून आता अभिराम लीलाला शोधण्यासाठी बाहेर पडणार आहे. आता लीला अभिरामला सापडणार की नाही? अभिराम लीलापर्यंत पोहोचू शकेल की नाही? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point