एजेने लीलाला दिली हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत काय घडणार?-navri mile hitlerla 25th august 2024 update ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एजेने लीलाला दिली हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत काय घडणार?

एजेने लीलाला दिली हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी, 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत काय घडणार?

Aarti Vilas Borade HT Marathi
Aug 25, 2024 11:12 AM IST

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सध्या वेगळे वळण आले आहे. या मालिकेत एजेची जिद्द पाहून हॉटेलमध्ये नोकरी करण्याची संधी दिली आहे. आता मालिकेत पुढे काय होणार वाचा...

Navri Mile Hitlerla
Navri Mile Hitlerla

‘नवरी मिळे हिटलरला’ ही छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतील लीला आणि एजेची कथा प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. लीला एजेच्या आयुष्यात अनेक मनोरंजक किस्से घडताना दिसत आहेत. कधी ती किडनॅपच होते तर कधी तिला केक खाण्याची शिक्षा होते. पण लीला कशी संधीच सोन करते आणि लीलाची लीलागिरी पाहण्यात प्रेक्षकांना जास्त उत्सुकता असते. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. लीला ही एजेच्या हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करणार आहे.

रेवतीने एजेला बांधली राखी

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत सध्या लीलाच्या घरच्यांना साळुंखेने पुन्हा त्रास द्यायला सुरूवात केली आहे. राखिपौर्णिमेच्या दिवशी साळुंखे घरात असताना एजे- लिलाच्या घरी पोहोचतो आणि तिथे एजेला साळुंखेकडून घेतलेल्या लोन बद्दल कळतं. एजे ते लोनचे पैसे भरायचं ठरवतो. पण लीला ऐनवेळी येते आणि नकार देते. रेवती एजेने तिचं रक्षण केलं म्हणून एजेंना राखी बांधण्याचं ठरवते.

एजेने लीलाला दिली नोकरची संधी

एजे रेवतीला ओवाळणी म्हणून १८ लाखांचा चेक देतो. एजेचं हे वागणं एकीकडे लीलाला आवडत आहे पण दुसरीकडे तिचा स्वाभिमान ही दुखावला जात आहे. ती एजेचे पैसे त्यांना परत करण्याचं ठरवते आणि वाट्टेल ते काम करायला तयार होते. लीलाची जिद्द पाहून एजे तिला आपल्या हॉटेलमध्ये काम करण्याचा सल्ला देतो. एजे, लीलाला हॉटेलमध्ये वेटरच काम करायला सांगतो. लीला, किती काळ एजेच्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम टिकवू शकेल? एकत्र काम करत असताना एजे-लीलाच नातं एक नवीन दिशा घेईल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत.
वाचा: अरबाज खानचा मुलगा अरहान सावत्र आईसोबत फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल, दोघांमधील नाते पाहून नेटकरी खूश

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका सध्या अतिशय हीट आहे. या मालिकेत अभिनेता राकेश बापट एजेची भूमिका साकारत आहे. तर वल्लरी लोंढे लीलाची भूमिका साकारत आहे. लीलाचे लग्न हे एजेशी होते. पण लग्न होईपर्यंत एजेला माहिती नसते की त्याचे लग्न श्वेता ऐवजी लीलाशी झाले आहे. त्यानंतर मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.