रेवतीचा जीव वाचवण्यासाठी ‘हिटलर’ अभिराम करणार लीलाची मदत! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रंजक वळण-navri mile hitlerla 2 april 2024 serial update abhiram will help leela in revati case ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  रेवतीचा जीव वाचवण्यासाठी ‘हिटलर’ अभिराम करणार लीलाची मदत! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रंजक वळण

रेवतीचा जीव वाचवण्यासाठी ‘हिटलर’ अभिराम करणार लीलाची मदत! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रंजक वळण

Apr 02, 2024 11:25 AM IST

एरव्ही लीलासोबत छत्तीस आकडा असणारा अभिराम यावेळी मात्र लीलाच्या मदतीसाठी धावून जाणार आहे. अभिरामच्या बोलण्यामुळे आता डॉक्टर रेवतीवर उपचार करण्यास सुरुवात करणार आहेत.

रेवतीचा जीव वाचवण्यासाठी ‘हिटलर’ अभिराम करणार लीलाची मदत! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रंजक वळण
रेवतीचा जीव वाचवण्यासाठी ‘हिटलर’ अभिराम करणार लीलाची मदत! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये रंजक वळण

छोट्या पडद्यावर नुकत्याच काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. ‘नवरी मिळे हिटलर’ला ही यापैकीच एक नवी मालिका आहे. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाने आणि कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालायला सुरुवात केली आहे. ‘हिटलर’ स्वभावाचा अभिराम आणि सतत गोंधळ घालणारी गोंधळी लीला यांची ही कथा ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेतून पाहायला मिळत आहे. या मालिकेचे काही भाग नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.

मालिकेच्या आतापर्यंतच्या कथानकानुसार, लीला हिला अभिनेत्री बनायचे आहे. तर, तिची सावत्र आई कर्जाच्या बदल्यात सावकाराला लीलाशी लग्न लावून देण्याचा कबूल करते. दुसरीकडे, लीलाची सावत्र बहिण रेवती हिचा लीलावर प्रचंड जीव आहे. आता रेवती विक्रांत नावाच्या एका मुलाच्या प्रेमात पडली आहे. विक्रांत आणि रेवतीच्या नात्यात आता काही कारणांमुळे दुरावा निर्माण होणार आहे. या दरम्यान दोघेही आपला जीव देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तिथे विक्रांतने रेवतीला व्हिडीओ कॉल करून स्वतःच्या हाताची नस कापून घेतली आहे. तर, हे पाहून रेवतीने देखील स्वतःच्या हाताची नस कापून घेतली आहे.

सायली आणि मुक्तानेच मारली बाजी! पाहा ‘या’ आठवड्यात टीआरपीमध्ये ‘टॉप ५’ मराठी मालिका कोणत्या?

रेवतीवर उपचार करण्यास डॉक्टरांचा नकार!

आता कडेकोट लावलेलं दार पाहून लीलाला काहीतरी वेगळाच संशय आल्याने आता लीला घराची खिडकी उघडून आतमध्ये डोकवायचा प्रयत्न करणार आहे. त्यावेळी तिला जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आपली बहीण दिसणार आहे. तर, कशाचाही विचार न करता लीला रेवतीला थेट हॉस्पिटलला घेऊन जाणार आहे. रेवती हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टर आधी तिची तपासणी करून ही आत्महत्येची केस आहे, तेव्हा तुम्ही पहिला पोलिसांना बोलवा, त्याशिवाय आम्ही उपचार सुरू करणार नाही, असं लीलाला म्हणणार आहेत. त्याचवेळी डॉक्टर आणि लीला मधील हे बोलणं अभिरामच्या कानी पडणार आहे.

छप्परफाड कमाई करणाऱ्या ‘क्रू’ चित्रपटासाठी करीना कपूर आणि इतर कलाकारांना किती पैसे मिळाले? वाचा...

अभिराम करणार लीलाची मदत

काही कामानिमित्त हॉस्पिटलमध्ये आलेला अभिराम आता डॉक्टरांची चांगली शाळा घेणार आहे. ‘डॉक्टर आहात तुम्ही... डॉक्टरकी स्वीकारताना एक शपथ घेतली होती की, तुम्ही प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवाल. रुग्णासाठी तुम्ही देव आहात, त्यामुळे तुम्ही तुमचं काम सुरू करा. रेवतीचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रोफेशनला जागा’, असं म्हणत अभिराम डॉक्टरलाच सुनावणार आहे. एकाअर्थी अभिराम लीलाची मदत करणार आहे. एरव्ही लीलासोबत छत्तीस आकडा असणारा अभिराम यावेळी मात्र लीलाच्या मदतीसाठी धावून जाणार आहे. अभिरामच्या बोलण्यामुळे आता डॉक्टर रेवतीवर उपचार करण्यास सुरुवात करणार आहेत. ही गोष्ट कळल्यावर लीलाच्या मनात अभिरामविषयी असलेला गैरसमज दूर होईल का?, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

विभाग