मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एजेंनी पूर्ण केलं लीलाला दिलेलं वचन! पण आता येणार कथेत ट्वीस्ट; ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये पुढे काय घडणार?

एजेंनी पूर्ण केलं लीलाला दिलेलं वचन! पण आता येणार कथेत ट्वीस्ट; ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये पुढे काय घडणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 10, 2024 11:57 AM IST

एजे म्हणजे दिलेला शब्द पाळणारा माणूस अशीच त्यांची ओळख... मात्र, या बदल्यात त्यांनी लीलाकडून देखील एक वचन मागितलं होतं.

एजेंनी पूर्ण केलं लीलाला दिलेलं वचन! पण आता येणार कथेत ट्वीस्ट; ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये पुढे काय घडणार?
एजेंनी पूर्ण केलं लीलाला दिलेलं वचन! पण आता येणार कथेत ट्वीस्ट; ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये पुढे काय घडणार?

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात एजे त्यांच्या वचनाची पूर्ती करताना दिसणार आहेत. रेवतीला विक्रांत फसवत असल्यामुळे लीलाने एजेंकडे मदत मागितली होती. एजे हे असे एकटेच व्यक्ती आहेत, जे विक्रांतला धडा शिकवू शकतात,हे लीलाला ठाऊक होते आणि यामुळेच लीलाने त्यांच्याकडे मदत मागितली होती. तर, एका महिलेवर अन्याय होतोय, तिला फसवलं जातय, हे कळल्यानंतर एजेंनीदेखील लीलाला मदत करण्याचं वचन दिलं. आता एजे म्हणजे दिलेला शब्द पाळणारा माणूस अशीच त्यांची ओळख... मात्र, या बदल्यात त्यांनी लीलाकडून देखील एक वचन मागितलं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

वेळ आल्यानंतर मी तुझ्याकडे जे मागेन, ते तुला द्यावं लागेल अर्थात तुला ते करावं लागेल, असं त्यांनी लीलाला म्हटलं होतं. तर, माझ्या बहिणीसाठी मी जीव देखील देऊ शकते, असं लीलाने म्हटलं होतं. आता एजेंनी लीलाला दिलेले वचन पूर्ण केल्यानंतर, लीलाला देखील तिच्या वचनाची पूर्ती करावी लागणार आहे. मात्र, आता एजे म्हणजेच अभिराम जहागीरदार लीलाकडे अशी एक गोष्ट मागणार आहेत, जे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे. विक्रांत हा एजेंच्या सुनेचा भाऊ आहे, हे नुकतेच समोर आले आहे. आता विक्रांत सांगूनही ऐकत नाही म्हटल्यावर एजेंनी त्याला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रामधून बाहेर पडले म्हणजे...’, अभिनेत्री विशाखा सुभेदार यांचं थेट वक्तव्य! म्हणाल्या...

विक्रांतचे कारनामे उघड होणार!

आपण दिल्लीला जातोय असं सांगून, त्यांनी विक्रांतला घरी बोलावलं होतं. मात्र, एजे कुठेही न जाता घरीच थांबलेले होते. त्यांना अचानक समोर पाहून विक्रांतची भंबेरी उडाली होती. एजेंनी आपल्या बायकोसमोर आपले बिंग फोडू नये, यासाठी तो त्यांना धमकवायचा प्रयत्न करत होता. मात्र, विक्रांतचे बॉस म्हणजेच एसीपी सर हे एजेंच्याच घरात उपस्थित होते. विक्रमचे सगळे कारनामे ऐकताच त्यांनी विक्रांतला तत्काळ निलंबित केले. त्यामुळे आता विक्रांतला त्याच्या वर्दीचा वापर करता येणार नाहीये. तर, ‘पुढच्या अर्ध्या तासात जाऊन तू रेवतीला सगळ्या खऱ्या गोष्टी सांगशील, नाहीतर मी तुला समाजात तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवणार नाही’, अशी धमकी एजेंनी विक्रांतला दिली आहे.

लीला घालणार लग्नाची मागणी

अभिरामची धमकी ऐकताच विक्रांतही हादरून गेला आहे. त्याने तडक रेवतीच्या घरी जाऊन तिच्या समोर सगळ्या गोष्टींची कबुली दिली आहे. आपलं तुझ्यावर प्रेम नसून, हा केवळ टाईमपास होत आहे. विक्रमने रेवतीला सगळं सांगून टाकले आहे. त्यामुळे आता रेवतीला लीलाच सगळं बोलणं पटणार असून, रेवती आता या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करणार आहे. आपल्याला मदत केल्याबद्दल आणि आपल्याला बहिणीला या विकृत विक्रांतच्या तावडीतून सोडवल्याबद्दल आभार मानण्यासाठी लीला एजंटच्या घरी जाणार आहे. त्यावेळी एजे लीलाला तिच्या वचनाची आठवण करून देणार आहेत. मात्र, एजेंची मागणी ऐकून लीलाला धक्का बसणार आहे. रेवतीला विक्रांतच्या तावडीतून सोडवण्याच्या बदल्यात एजे आता लीला लग्नाची मागणी घालणार आहेत. यावर आता लीला काय उत्तर देणार, हे आता मालिकेच्या पुढच्या भागात पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग