मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  AJने लीलाला घातली लग्नाची मागणी, 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये रंजक वळण

AJने लीलाला घातली लग्नाची मागणी, 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये रंजक वळण

Aarti Vilas Borade HT Marathi
Mar 30, 2024 11:24 AM IST

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत AJने नुकताच लीलाला लग्नाची मागणी घातली आहे. आता लीलाचे काय असेल उत्तर हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना मालिका पाहायला मिळणार आहे.

AJने लीलाला घातली लग्नाची मागणी, 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये रंजक वळण
AJने लीलाला घातली लग्नाची मागणी, 'नवरी मिळे हिटलरला'मध्ये रंजक वळण

झी मराठी वाहिनीवरी 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांसाठी आकर्षण ठरली आहे. कारण या मालिकेत अभिनेता राकेश बापट महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासूनच या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला. आता या मालिकेत एक रंजक वळण आले आहे. ते नेमके काय आहे चला जाणून घेऊया...

'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांचे मनोरंज करत आहे. मालिकेत AJ आणि लीला यांची कथा दाखवण्यात आली आहे. तसेच त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. येणाऱ्या आठवड्यात सीताच्या रूपात लीला AJच्या घरी जाणार आहे. त्याचवेळेस विश्वरूपने लीलाचा अपमान करण्यासाठी मिडीयाच्या लोकांना घरी बोलावले आहे. दुर्गा लीलाच्या बाबांचा अपमान करते की तुम्ही हे सगळं मुद्दाम करत आहात. त्यामुळे लीला सांगते की मी लग्नासाठी नाही तर ऑडीशन द्यायला आले होते. या अंकलसोबत लग्न करायला असे ही कोण तयार होणार?
वाचा: कसा आहे करीना आणि तब्बूचा 'क्रू' सिनेमा? वाचा रिव्ह्यू

लीलाने एकंदरीत घातलेला गोंधळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे एजेच्या आईला लीलाचा बिनधास्तपणा, स्वभाव पसंत पडला आहे. ती एजेला सांगते की मला लीलामध्ये अंतरा दिसायला लागली आहे. तर दुसरीकडे लीलाला धडा शिकवायचा म्हणून लक्ष्मी तिचे फोटो पेपरमध्ये छापते. तिची बदनामी करण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर एजे लीलाच्या आई वडीलांची माफी मागायला घरी जातो. त्याचवेळेस तो लीलाला लग्नाची ऑफर देतो. आता AJ च्या लग्नाच्या मागणीला, काय असेल लीलाच उत्तर? ये मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळणार आहे.
वाचा: ओंकार भोजने दिसणार महेश मांजरेकरांसोबत, सिनेमाच्या पोस्टने वाढवली उत्सुकता

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेतील कलाकारांविषयी

'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेत अभिनेता राकेश बापट महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. त्यासोबत वल्लरी विराज, शर्मिला शिंदे, भुमीजा पाटील, सानिका काशीकर हे कलाकार दिसत आहे. तसेच नुकताच मालिकेत अद्वैत कडणे या कलाकाराची एण्ट्री झाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग