‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात लीला स्वतःच्या स्वप्नातून जागी होऊन, आता अभिरामला या जाहिरातीसाठी तयार करणारच, या उद्देशाने त्याच्या घरी पोहोचणार आहे. मात्र, आता अभिरामला तयार कसं करायचं? यासाठी ती आधी दुर्गाची मदत घेणार आहे. रातोरात दुर्गाला फोन करून लीलादुर्गाकडे मदत हवी आहे म्हणून आपल्याला तुम्हाला भेटायचं आहे, असं सांगणार आहे. मात्र, यावेळी लीला मदत मागतेय हे ऐकून दुर्गा संतापणार आहे. परंतु, आपण तुला सकाळी भेटायला घरी येणारच, असं म्हणत लीलाने देखील दुर्गाला ठणकावून सांगितलं.
आता लीला सकाळ झाल्या झाल्या थेट अभिरामच्या घरी दुर्गाला भेटण्यासाठी पोहोचणार आहे. तर, दुर्गाला दारातच बघून लीला तिथेच तिला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. मात्र, ‘तू वेडी झाली आहेस का? एजेने जर ठरवलं, तर मोठ्या मोठ्या जाहिरात एजन्सी इथे रांगा लावतील आणि तू एका छोट्याशा फालतू लोणच्याच्या जाहिरातीत काम करण्यासाठी अभिरामला विचारतेस. तुला अक्कल आहे का?’, असं म्हणत दुर्गा लीलालाच काही गोष्टी ऐकवते. मात्र, आता लीलाकडे दुसरा कुठलाही पर्याय शिल्लक नाहीये.
‘तुम्ही अभिरामला या जाहिरातीसाठी तयार करा. नाहीतर तुमचा सगळा प्लॅन मी त्यांना जाऊन सांगेन’, असं म्हणत आता लीलाला दुर्गाला ब्लॅकमेल करणार आहे. जर, दुर्गाने अभिरामला जाहिरातीत काम करण्यासाठी तयार केलं नाही, तर लीला तिचं लग्न अभिरामशी कसं मोडलं, यासाठी तिला कोणी मदत केली आणि हा प्लॅन कोणाचा होता हे सगळं जाऊन त्याला सांगणार आहे. लीलाच्या या धमकीमुळे दुर्गा चांगलीच घाबरून गेली.
लीला अभिरामच्या बायकोच्या रूपाने या घरात येऊ नये आणि आपली सासू होऊ नये, यासाठी हा सगळा प्लॅन दुर्गानेच केला होता. भर, मेहंदी सोहळ्यातून लीला पळून जाण्यासाठी मदत देखील दुर्गानेच केली होती. ही गोष्ट जर अभिरामच्या समोर आली, तर आपली काय अवस्था होऊ शकते, याची दुर्गाला चांगलीच कल्पना आहे. त्यामुळे आता दुर्गा देखील लीलाच्या मागणीचा विचार करून अभिरामला या जाहिरातीसाठी तयार करण्याचा प्रयत्न करणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.