मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट

अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 07, 2024 03:52 PM IST

अभिरामच्या वागण्यामुळे लीलाच्या हातून आलेलं काम जातंय की काय, असं वाटत असतानाच आता तिच्या वाट्याला एक सुवर्णसंधी चालून आली आहे.

अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट
अभिराम खरंच लीलाच्या कानाखाली मारणार? ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार जबरदस्त ट्विस्ट

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जबरदस्त ड्रामा पाहायला मिळणार आहे. लीला आणि तिची लहान बहीण रेवती या दोघींनी मिळून साळुंकेला धमकी दिली आहे. लीलाशी लग्नाची स्वप्न बघणारा साळुंके पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबावर दबाव टाकायला बघत होता. अभिरामशी लग्न मोडल्यानंतर साळुंके पुन्हा एकदा लीलाच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करत होता. लीलाच्या कुटुंबावर साळुंकेचं तब्बल २५ लाखांचं कर्ज आहे आणि या कर्जाच्या बदल्यात तो लीलाशी लग्न करण्याची स्वप्न बघत आहे. मात्र, आतापर्यंत शांत बसलेल्या लीलाने यावेळी एल्गार केला आहे. साळुंकेला पुन्हा एकदा आपल्या दारात येऊन आपल्याच आई-वडिलांशी वाईट वागताना पाहून लीला संतापली आहे आणि तिने साळुंकेला थेट धमकीच दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘यापुढे तुझ्या कर्जाचे सगळे हफ्ते तुला वेळेवर मिळतील. पैसे नाही मिळाले तरच आमच्या दारात पाऊल ठेवायचं, नाहीतर आजूबाजूला फिरकायचं देखील नाही’, असं म्हणत लीला आणि रेवती यांनी साळुंकेला आपल्या घरातून हाकलवून लावले आहे. आता पैसा कसा मिळवायचा आणि जमवायचा यासाठी दोन्हीही बहिणी खूप प्रयत्न करत आहेत. इतक्यातच लीलाला एका जाहिरातीच्या ऑडिशनसाठी फोन आला आणि लीला खुश झाली. पहिलंच काम असल्याने लीला धावत पळतच कामाच्या ठिकाणी पोहोचली होती.

सरगमची अट मान्य करून अक्षरा तिला घरात घेऊन येईल का? ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मध्ये येणार ट्वीस्ट

लीलाला दिग्दर्शक घालणार मोठी अट!

तर, अंतराची लीलाकडे राहिलेली अंगठी घेण्यासाठी अभिराम देखील या जाहिरातीच्या सेटवर पोहोचला होता. जाहिरातीच्या शूटिंगमध्ये शिरत अभिरामने लीलाला बाहेर खेचून आणलं आणि तिच्या हातातली अंगठी काढून घेतली. अभिरामच्या अशा वागण्यामुळे लीलाच्या हातून हे काम जातंय की काय, असं वाटत असतानाच आता तिच्या वाट्याला एक सुवर्णसंधी चालून आली आहे. लीला काम करत असलेला जाहिरातीच्या दिग्दर्शकाने तिला जाहिरातीत मुख्य भूमिका देण्याचं आमिष दाखवलं आहे. मात्र, ही मुख्य भूमिका मिळवण्यासाठी लीलाला एक मोठी कामगिरी करावी लागणार आहे. या जाहिरातीत काम करण्यासाठी अभिरामला देखील तयार करा, अशी अट दिग्दर्शकाने लीलाला घातली आहे.

लीला अभिरामला तयार करू शकणार?

या बदल्यात जाहिरात दिग्दर्शक लीलाला पुढच्या अनेक जाहिरातींमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणून काम मिळवून देणार आहे. लीलाच्या समोर आता अभिरामला जाहिरातीत काम करण्यासाठी तयार करणे, हे मोठे आव्हान आहे. परंतु, लीला ही कामगिरी कशी करणार याकडेच आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मालिकेच्या येत्या भागात लीला अभिरामकडे जाऊन त्याला जाहिरातीत काम करण्याची विनंती करताना पाहायला मिळणार आहेत. मात्र, या दरम्यान चिडलेला अभिराम लीलाच्या कानाखाली आवाज काढणार आहे. अर्थात हे सगळं खरं घडत नसून, लीलाच्या स्वप्नात घडत आहे. मात्र, प्रेक्षकांना यामुळे मनोरंजक कथानक पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point