‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात लीला धावत धावत अभिरामच्या लग्न मंडपात पोहोचणार आहे. लीलाला अभिरामच्या लग्नात बोलवण्यासाठी विक्रांतने रेवतीला किडनॅप केले आहे. रेवतीच्या जीवाची धमकी देत विक्रांतने लीलाला एजेच्या लग्नात बोलवलं आहे. आता लीला आपल्या बहिणीच्या काळजीपोटी धावत धावत लग्नात पोहोचणार आहे. रेवतीला सुखरूप सोडवण्याच्या बदल्यात लीलाला अभिरामशी लग्न करावं लागणार आहे. मात्र, अभिरामचं लग्न काही वेळातच होणार असून, आपण तिथे कसं काय उभं राहणार, असा प्रश्न लीलाला पडला होता. मात्र, कशाचाही फार विचार न करता लीला धावत धावत मंडपापर्यंत पोहोचली आहे.
तिथे गेल्यावर पुन्हा एकदा विक्रांतने तिला फोन केला आणि श्वेताच्या रूममध्ये जाऊन तिला बेशुद्ध करून तिच्या ऐवजी तू तयार होऊन खाली लग्न मंडपात यायचं, असं सांगितलं. मात्र, ‘मी श्वेताला बेशुद्ध करू शकत नाही. मला ते जमणार नाही’, असं लीला त्या किडन्यॅपरला म्हणजेच विक्रांतला सांगते. विक्रांतने स्वतःचा चेहरा पूर्ण झाकून घेतला असल्यामुळे त्याची ओळख अजूनही लीलाला पटलेली नाही. मात्र, तो रेवतीच्या गळ्यावर चाकू ठेवताच लीला श्वेताला बेशुद्ध करायला तयार होणार आहे.
लीला श्वेताच्या रूममध्ये जाऊन तिला बेशुद्ध करणार, इतक्यात ती पाहते की, श्वेता आधीपासूनच बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. हे पाहून लीला खूपच घाबरून जाणार आहे. गौरीहार पूजनाच्या कलशातील पाणी घेऊन ते श्वेताच्या तोंडावर मारून ती श्वेताला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. मात्र, श्वेतावर त्याचा काहीही फरक पडणार नाही. काहीच वेळापूर्वी साळुंकेने वेटरच्या रूपात तिथे येऊन श्वेताच्या डोक्यात फुलदाणी मारली होती. त्यामुळे श्वेता बेशुद्ध पडली आहे. मात्र, याची कोणालाही काहीही कल्पना नाही.
आता घाबरलेली लीला श्वेताला एका कोपऱ्यातला लपवून तिची साडी आणि दागिने घालून स्वतः तयार होणार आहे. श्वेताच्या जागी लग्न मंडपात लीला उभी राहणार आहे. मात्र गुरुजींच्या अटीमुळे चेहऱ्यावर पदर असल्याने हे कोणाच्याही समोर येणार नाही. सुनमुख बघेपर्यंत नव्या सुनेला तिच्या चेहऱ्यावरचा पदर काढता येणार नाही आणि आपला चेहरा कोणालाही दाखवता येणार नाही, अशी अट गुरुजींनी जहागीरदारांना घातली आहे. यामुळे या पदराआड श्वेता नाही तर लिहिला आहे याबाबत कोणालाही पुसटशीही कल्पना आलेली नाही. मात्र, लीलाचा चेहरा उघड झाल्यावर लग्न मंडपात चांगलाच गोंधळ उडणार आहे.