नियती बदलायला लावणार का अभिरामला त्याचा निर्णय? ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  नियती बदलायला लावणार का अभिरामला त्याचा निर्णय? ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत आज काय घडणार?

नियती बदलायला लावणार का अभिरामला त्याचा निर्णय? ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत आज काय घडणार?

May 29, 2024 03:04 PM IST

अनेक प्रयत्न करून देखील लीला आणि अभिरामचं लग्न जमू शकलं नाही, याचं सगळ्यात जास्त दुःख सरोजिनी आजीला वाटत आहे.

नियती बदलायला लावणार का अभिरामला त्याचा निर्णय?
नियती बदलायला लावणार का अभिरामला त्याचा निर्णय?

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिराम आणि श्वेताचा लग्नसोहळा पुढे सरकताना दिसणार आहे. अनेक प्रयत्न करून देखील लीला आणि अभिरामचं लग्न जमू शकलं नाही, याचं सगळ्यात जास्त दुःख सरोजिनी आजीला वाटत आहे. दुसरीकडे, आजी स्वतः श्वेताला लीला समजून हाक मारताना दिसत आहे. कालच्या भागात लीलाने मावशी आईला कुणाशी तरी बोलताना पाहिलं होतं. आज ती मावशी आईला घेऊन येण्यासाठी तिथे खाली स्टोर रूममध्ये उतरणार आहे. मात्र, मावशी आई एकटीच इथं काय करते? असा प्रश्न तिला पडणार आहे. तर तिच्या प्रश्नाचे उत्तर देताना कालिंदी तिला म्हणणार आहे की, मी बाथरूम शोधत इथवर आले आहे. तेव्हा लीला तिला बाथरूम इथे नाही, तर वरच्या बाजूला आहे, असं सांगणार आहे.

त्याचवेळी तिथं काहीतरी पडल्याचा आवाज येणार आहे त्यामुळे लीलाचा संशय आणखी बळवणार आहे. या खोलीत आपल्या दोघींशिवाय आणखी कोणीतरी आहे, असं लीलाला वाटणार आहे. त्यामुळे लीला संपूर्ण खोलीत शोधाशोध सुरू करणार आहे. तिकडे एका बॉक्स खाली लपून बसलेला विक्रांत आता प्रचंड घाबरला आहे. लीलाने आपल्याला पकडले तर, सगळा प्लॅन समोर येणार, असं त्याला वाटत आहे. मात्र, कालिंदी लीलाला दम देऊन आता तिथून घेऊन जाणार आहे. साखरपुड्यासाठी श्वेताला तयार करून घेऊन यायची जबाबदारी लीला आता स्वतःवर घेणार आहे. श्वेताच्या खोलीत गेलेल्या लीलाला पाहून श्वेताचे आई-वडील मात्र तिच्यावर चिडणार आहेत. यावेळी आपल्या लग्न मोडलं, म्हणून आपल्याला कोणताही दुःख झालेलं नाही, उलट मला हे लग्न करायचं नव्हतं, असं म्हणून लीला त्यांचा गैरसमज दूर करणार आहे. तर, श्वेता आणि लीलामध्ये देखील चांगली मैत्री होणार आहे.

प्रियाच्या नजरेस पडणार का शिवानी? अर्जुन-सायलीचे कष्ट वाया जाणार? ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

श्वेताच्या बोटात अंतराची अंगठी जाईना!

आता लीला श्वेताला घेऊन मांडवात येणार आहे. यावेळी अभिराम आणि श्वेता यांचा साखरपुडा सोहळा पार पडणार आहे. या साखरपुडा सोहळ्यात अभिराम अंतराची अंगठी श्वेताच्या बोटात घालताना दिसणार आहे. मात्र, ही अंगठी श्वेताच्या हातात काही केल्या जात नाही. मात्र, जबरदस्ती अंगठी घालण्याचा प्रयत्न झाल्यावर श्वेताचं बोट दुखल्यामुळे ती हात झटकून लावते. आणि यामुळे ती अंगठी उडवून लावते. अंतराच्या अंगठीचा झालेला अपमान अभिरामला सहन होत नाही.

लीलाच्या पायाशी जाणार अंगठी!

आता ही अंगठी नेमकी कुठे पडली, यासाठी सगळे शोधाशोध करत आहे. अंतराची अंगठी नेमकी लीलाच्या पायापाशी जाऊन पडली आहे आणि आता लीला ती अंगठी उचलून आपल्या दुप्पट्यानं व्यवस्थित पुसणार आहे. लीलाला या अंगठीचं मोल आधीच माहित आहे. त्यामुळे ती काळजी घेत आहे. तर, हे करत असताना अभिरामच लक्ष लीलाकडे जाणार आहे. आपला निर्णय चुकतोय का?, असा प्रश्न पुन्हा एकदा अभिरामला पडणार आहे. आता अभिराम पुढं काय निर्णय घेणार, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner