मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिरामच्या लग्नात कालिंदी घालणार मोठा गोंधळ! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दिसणार लग्नाची धामधूम

अभिरामच्या लग्नात कालिंदी घालणार मोठा गोंधळ! ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत दिसणार लग्नाची धामधूम

May 28, 2024 02:27 PM IST

जहागीरदारांच्या लग्नात शिरकाव करून कालिंदी श्वेताच्याऐवजी अभिरामचं लग्न लीलाशी व्हावं, म्हणून शर्थीचे प्रयत्न करणार आहे.

अभिरामच्या लग्नात कालिंदी घालणार मोठा गोंधळ!
अभिरामच्या लग्नात कालिंदी घालणार मोठा गोंधळ!

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत आता अभिराम आणि श्वेता यांचं लग्न पाहायला मिळत आहे. मात्र, या लग्नातही शिरकाव करून कालिंदी श्वेताच्याऐवजी अभिरामचं लग्न लीलाशी व्हावं, म्हणून शर्थीचे प्रयत्न करणार आहे. केवळ कालिंदीच नाही, तर विक्रांत, किशोर आणि साळुंके हे तिघे देखील अभिराम आणि लीलाचं लग्न लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. विक्रांतने प्लॅन बनवला असून, त्या प्लॅननुसार आता कालिंदीला पुढे जायचं आहे. आणि विक्रांतच्या प्लॅननुसारच लीला आणि अभिरामचं लग्न होऊ शकतं, असं कालिंदीला वाटतं आहे. दुसरीकडे, विक्रांत या लग्नात शिरला आहे, हे आता अभिरामला देखील कळलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

अभिराम त्याला पकडून विचारणार इतक्यात किशोरने त्याची सुटका केली आहे. मात्र, किशोर आणि विक्रांत यांचं आपापसांत अजिबातच पटत नाहीये. यामुळे कोणाच्या प्लॅनने पुढे जायचं यावरून दोघांचेही वाद होत आहेत. मात्र, आता किशोरने सगळी धुरा आपल्या हातात घेतली असून, लीलाच अभिरामची बायको कशी होईल, याची तो पुरेपूर काळजी घेणार आहे. दुसरीकडे, लक्ष्मी, दुर्गा आणि सरस्वती लीला आणि तिच्या कुटुंबाचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीय. एकीकडे लक्ष्मी आणि सरस्वती लीलाच्या आईचा म्हणजेच कालिंदीचा अपमान करत असतात. तर, दुसरीकडे दुर्गा ही लीलावर लक्ष ठेवून असते.

अखेर साक्षीला मिळणार कोर्टाची नोटीस! शिवानी देणार खरी साक्ष! ‘ठरलं तर मग’मध्ये थरारक वळण!

दुर्गा लीलाला विचारणार जाब!

दुर्गा लीलाला म्हणते की, ‘तुमचा काहीतरी हेतू असल्याशिवाय तुम्ही इथे येणार नाही, तुमचं काय हेतू आहे हे मला आत्ताच सांगा.’ यावर तिला उत्तर देताना लीला गंमतीत म्हणते की, ‘तुम्हाला म्हणून सांगते, इतर कुणाला सांगू नका हा... पण माझ्या मावशी आईने विडाच उचलला आहे. ती अभिरामचं लग्न इतर कोणाशीच होऊ देणार नाही. अभिरामचं लग्न माझ्याशी नाही झालं, तर ते श्वेताशीही होणार नाही, यासाठी मावशी आईने काहीतरी प्लॅन केला आहे. पण, मला याबद्दल काहीच माहित नाही. मी तिला कुणाशी तरी बोलताना ऐकलं होतं’.

विक्रांतची चोरी लीला पकडणार?

आता दुर्गा देखील तिच्या या बोलण्यावर विश्वास ठेवणार आहे. खरं तर, कालिंदी असंच काहीतरी वागत आहे. मात्र, लीलाला याची कल्पना नाही. लीलाने दुर्गाला गंमतीतच या गोष्टी सांगितल्या होत्या. आता कालिंदी सगळ्यांपासून लपून-छपून विक्रांतला भेटण्यासाठी स्टोर रूममध्ये जाणार आहे. तर, आपली मावशी आई कुठे चालली आहे हे बघण्यासाठी लीला देखील तिच्या मागोमाग स्टोअर रूममध्ये पोहोचणार आहे. त्यावेळी विक्रांत कालिंदीला लीला आणि अभिरामचं लग्न कसं लावायचं, याचं प्लॅनिंग सांगणार आहे. मात्र, लीलाने मावशी आईला आवाज दिल्याने आता पुढे काय घडणार, हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४