लीला आजीला सत्य सांगणार! आई अभिरामची माफी मागणार; ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लीला आजीला सत्य सांगणार! आई अभिरामची माफी मागणार; ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

लीला आजीला सत्य सांगणार! आई अभिरामची माफी मागणार; ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

May 23, 2024 02:36 PM IST

लीलाला आजीचा हा हताशपणा बघवत नाही आणि लीला आजीला सगळं खरं सांगून टाकते. लीला आजीला म्हणते की, मी हे लग्न मोडल्यामुळे अजिबातच दुःखी झालेले नाही.

लीला आजीला सत्य सांगणार! आई अभिरामची माफी मागणार
लीला आजीला सत्य सांगणार! आई अभिरामची माफी मागणार

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात लीला अजूनही आजीची समजूत काढताना दिसणार आहे. कालच्या भागात शेवटी आजी लीला आणि अभिरामकडून लग्नाचे वचन घेतल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र, आजच्या भागाच्या सुरुवातीलाच हे सरस्वतीचं स्वप्न असल्याचं सिद्ध होणार आहे. सरस्वती बसल्या बसल्या लीला आणि अभिराम यांच्याकडून आजी लग्न करण्याचं वचन घेत असल्याचं स्वप्न पाहते. मात्र, हे स्वप्न मोडताच ती जोराने किंचाळते आणि लक्ष्मी व दुर्गा यांना आपण असं स्वप्न पाहिल्याचं सांगते. तिच्या या स्वप्नाबद्दल ऐकून दोघींनाही धक्का बसतो.

मात्र, इथे आजी लीलाशी एकट्यातच काहीतरी बोलत असतात. त्याबद्दल बाहेर उभ्या असणाऱ्या कुणालाच काहीही कल्पना नसते. आजी लीलाची माफी मागतात. ‘माझ्या मुलाने तुझ्याशी ठरलेलं लग्न मोडून तुझं मन दुखावलं. तुला एकटं पाडलं. त्याबद्दल मी खरंच तुझी क्षमा मागते. त्याने असं करायला नको होतं, ही माझ्या मुलाची चूक आहे, तू मला माफ कर’, असं म्हणत आजी लीलाची माफी मागते. पण, लीलाला आजीचा हा हताशपणा बघवत नाही आणि लीला आजीला सगळं खरं सांगून टाकते. लीला आजीला म्हणते की, मी हे लग्न मोडल्यामुळे अजिबातच दुःखी झालेले नाही.

सायली घर सोडून गेल्याच्या धक्क्याने अर्जुन पडला बेशुद्ध! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आज काय घडणार?

लीला आजीला सत्य सांगणार!

तर, आजी तिला विचारते की, मग तू काल चेहरा पाडून का बसली होतीस? त्यावर लीला म्हणते की, ‘ती माझी मावशी आई आजारी असल्यामुळे मला तिच्यासाठी वाईट वाटत होतं. मात्र, अभिरामशी लग्न मोडल्याचं मला अजिबात वाईट वाटलं नाही. उलट हे लग्न मला कधी करायचं नव्हतं. अभिराम एकदम परफेक्ट माणूस आहे. तर मी अशी वेंधळी. आम्हा दोघांची जोडी कशी जमली असती? आम्ही दोघे एकमेकांना थोडा वेळ देखील सांभाळून घेऊ शकत नाही. अशात आम्ही एकमेकांबरोबर आयुष्य कसं काढणार? असं लीला आजीला म्हणते.

आजी अभिरामची माफी मागणार!

तर, हे लग्न कसं मोडलं या मागचं सत्य सांगताना लीला म्हणते की, ‘आजी हे लग्न अभिरामने मोडलेलं नाही. हे लग्न मलाच करायचं नव्हतं. त्यामुळे मी मेहंदी सोहळ्यातून पळ काढला होता. मात्र, मी लग्न मोडलं तर सगळे मला दोष देतील आणि मावशी आई चिडेल, म्हणून अभिरामने खोटं बोलून माझ्याशी लग्न मोडलं’, असं लीला आजीला सांगते. हे लग्न अभिरामने नाही मोडलं, तरीही आपण अभिरामलाच दोष दिला, त्याला वाईटसाईट बोललो हे कळल्यानंतर आजीला देखील वाईट वाटतं. यानंतर आजी अभिरामची माफी मागते. मात्र, लीला आणि आजीमध्ये आता छान मैत्री होणार आहे. त्या मैत्रीची निशाणी म्हणून आजी लीलाला अंतराची एक साडी देऊ करणार आहे. आता या साडीवरून काय रामायण घडणार, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner