लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये येणार ट्वीस्ट

May 20, 2024 04:03 PM IST

अभिराम आणि लीलाचा बदला घेण्यासाठी विक्रांत रचलेल्या प्लॅनमध्ये आता कालिंदी देखील सहभागी होणार आहे. विक्रांतच्या प्लॅननुसार जर लीला आणि अभिरामच लग्न झालं, तर दोघेही उद्ध्वस्त होतील.

लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक!
लीला आणि अभिरामच्या लग्नासाठी कालिंदीने केलंय खोटं नाटक!

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजचा भागात प्रेक्षकांना एक धमाल ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. अभिराम आणि लीलाचा बदला घेण्यासाठी विक्रांत रचलेल्या प्लॅनमध्ये आता कालिंदी देखील सहभागी होणार आहे. विक्रांतच्या प्लॅननुसार जर लीला आणि अभिरामच लग्न झालं, तर दोघेही उद्ध्वस्त होतील. यासाठी लीला आणि अभिरामकडून बदला घेण्यासाठी विक्रांत हा नवा प्लॅन रचत आहे. मात्र, याची कल्पना लीला किंवा अभिराम दोघांनाही नाही. विक्रांतच्या प्लॅननुसार कालिंदीने आजारपणाचं ढोंग करून आता अभिरामच्या लग्नाची पत्रिका मिळवली आहे. आता विक्रांत आणि कालिंदीच्या प्लॅननुसार लीलाला आयत्यावेळी नवरीच्या जागी बसवून तिचं अभिरामशी लग्न लावून द्यायचे आहे.

इथे विक्रांत घरी अभिरामच्या घरी जाऊन त्याच्या आईला लीलावरून काही गोष्टी बोलणार आहे. विक्रांत आजीच्या मनावर भावनिक आघात करण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘लीला बिचारी आता आयुष्यभर एकट्यानेच आयुष्य काढेल. लग्न मोडलेल्या अशा मुलीशी कोण लग्न करेल. बिचारी तिचे आई वडील शरमेनेच मारून जातील. त्यांची काय अवस्था झाली असे’, अशा गोष्टी बोलून त्याने आजीच्या मनात संशयकल्लोळ निर्माण केला आहे. या विचारांनी आता आजी मनातून खचून आणि गोंधळून गेली आहे. मात्र, आता आजी अभिराम आणि श्वेताच्या लग्नाचं निमंत्रण घेऊन लीलाच्या घरी जाणार आहे. यावेळी ती लीलाच्या आईची बिघडलेली तब्येत बघणार आहे. हे बघून आजीला आणखीनच धक्का बसणार आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे यांनी बजावला मतदानाचा अधिकार! म्हणाल्या ‘उरलेसुरले दिवस सुखाचे जातील असा...’

आजीला बसणार धक्का!

घरी येऊन आजीच्या मनात हेच विचार घोळू लागणार आहेत. यामुळे आजीला खूप मानसिक त्रास होणार असून, आजी चक्कर येऊन कोसळणार आहे. दुसरीकडे लीलाची आई आजारपणाचं नाटक करून लीलाकडून स्वतःची सेवा करून घेत आहे. आता ती लीलाला मंदिरात जायला सांगणार आहे. हा तुझ्या नाटकाचा एक भाग आहे असं समज आणि मी सांगतेय तसं कर, अशी तंबी कालिंदीने लीलाला दिली आहे. त्यामुळे आता लीला देखील ती बोलेल करायला तयार झाली आहे.

होईल का लीला आणि अभिरामचं लग्न?

एकीकडे आजी देखील लीला आणि अभिरामच्या लग्नाची स्वप्न बघत आहे. अनायासे आणि योगायोगाने अभिरामच्या लग्नाच्या सगळ्याच विधी श्वेता ऐवजी लीलासोबतच पार पडल्या आहेत. त्यामुळे देवच आपल्याला संकेत देतोय, असे आजीला वाटत आहे. त्यामुळे ती अभिरामची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अभिराम आता आपल्याला हट्टाला अडून बसला आहे.

Whats_app_banner