मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Navri Mile Hitler La 18th Mar: परफेक्ट अभिराम तर, अवखळ लीला; प्रेक्षकांना कसा वाटला ‘नवरी मिळे हिटलरला’चा पहिला भाग?

Navri Mile Hitler La 18th Mar: परफेक्ट अभिराम तर, अवखळ लीला; प्रेक्षकांना कसा वाटला ‘नवरी मिळे हिटलरला’चा पहिला भाग?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 19, 2024 12:54 PM IST

Navri Mile Hitler La 18th March 2024 Serial Update: प्रेक्षकांना ‘नवरी मिळे हिटलर ला’ मालिकेचा पहिला भाग कसा वाटला, हे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

प्रेक्षकांना कसा वाटला ‘नवरी मिले हिटलरला’चा पहिला भाग?
प्रेक्षकांना कसा वाटला ‘नवरी मिले हिटलरला’चा पहिला भाग?

Navri Mile Hitler La 18th March 2024 Serial Update: छोट्या पडद्यावर नव्याने एन्ट्री घेतलेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेचा पहिला भाग नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दोन टोकांच्या स्वभावाची आणि वयाची माणस एकत्र आल्यावर काय घडणार, हे या मालिकेत पाहायला मिळणार आहे. मालिकेच्या पहिल्याच भागात पुढील कथानकाची झलक पाहायला मिळाली आहे. अभिराम जहागीरदारची अर्थात एजेची ‘हिटलर’शाही पाहायला मिळाली आहे. तर, हिटलरची हीच हिटलरशाही संपवायला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अवखळ लीलाची एन्ट्री देखील हटके झाली आहे.

बेकरी चालवणाऱ्या मोहित्यांच्या घरातली लीला, तर मोठा उद्योगपती असलेला अभिराम जहागीरदार यांची जोडी कशी जमणार आणि यांची जोडी जमताना काय गंमतीजमती पाहायला मिळणार, याची एक झलक या पहिल्याच एपिसोडमधून प्रेक्षकांना मिळाली आहे. मध्यमवर्गीय घरात जन्मलेली लीला हिच्या कुटुंबाचे छोटीशी बेकरी आहे. लीला याच बेकरीत कामदेखील करते. दुसऱ्याची मदत करायला धावून जाण्याचा स्वभाव असणाऱ्या लीलाला दरवेळी कुठला ना कुठल्या विचित्र परिस्थितीचा सामना करावा लागतो. शुद्ध मनाने मदत करण्यासाठी निघालेली लीला नेहमीच कोणत्यातरी अडचणीत सापडते. ती जो प्रश्न सोडवायला जाते, तो प्रश्न सुटणार ऐवजी आणखी गुंतून जातो.

Tharala Tar Mag 19th Mar: सायलीला वाचवण्यात अर्जुन होणार यशस्वी! महिपत-साक्षीचा डाव फसणार?

लीला आणि अभिरामची जोडी जमणार?

तर, अभिराम मात्र अतिशय परफेक्ट आहे. प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी, जागच्या जागी आणि जशीच्या तशी दिसावी हा अभिरामचा नियम आहे. अभिरामची एन्ट्री होताच सगळ्या गोष्टी एकदम स्तब्ध होऊन जातात. त्याच्या हिटलर स्वभावामुळे सगळेच त्याला थोडे वचकून आहेत. पहिल्याच भागात लीला आणि अभिराम या दोघांचे टोकाचे विरुद्ध स्वभाव आणि अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळाले आहेत. प्रेक्षकांना ‘नवरी मिळे हिटलर ला’ मालिकेचा पहिला भाग कसा वाटला, हे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे.

Marathi Actress News: छोटा पडदा गाजवणारी मराठी अभिनेत्री लग्नानंतर ४ वर्षांनी भारतात परतली! पोस्ट लिहित म्हणाली...

प्रेक्षक काय म्हणतायत?

अनेक प्रेक्षकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. ‘खूप भारी लीला हे पात्र मस्त आहे, AJ तर खूप खूप खूप आवडले यार... मस्त होता आजचा भाग’, ‘खूप छान होता आजचा एपिसोड. मला त्या ३ सुना खूप छान वाटल्या, त्यांच्यात असलेलं बाँडिंग खूप छान दाखवलं आहे’, ‘सुपरहिट मालिका असणार आहे, फक्त तेवढी मालिकेची वेळ बदला म्हणजे लवकर पाहता येईल..’, ‘पहिला भाग खूप छान दाखवला, आशा करतो की पुढचे सर्व भागही हे उत्तमच असतील’, ‘अप्रतिम खूपच छान होता पहिला भाग, खूपच छान होती मालिका.. मी आज स्टार्टिंगपासून पाहिली. मला खूप आवडली’, अशा प्रेक्षकांच्या कमेंट पाहायला मिळत आहेत.

IPL_Entry_Point

विभाग