मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अखेर अभिराम नमला; लीलाला घरी घेऊन जाणार! पण... ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार नवं वळण

अखेर अभिराम नमला; लीलाला घरी घेऊन जाणार! पण... ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार नवं वळण

Jun 17, 2024 02:27 PM IST

अभिराम लीलाने आपली फसवणूक केली असे समजून तिच्यावर चिडला आहे. त्याने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, अभिरामला आता लीलाला घरी घेऊनच जावं लागणार आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार नवं वळण
‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत येणार नवं वळण

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत प्रेक्षकांना आता एक नवं वळण पाहायला मिळणार आहे. अभिरामच्या लग्नात अचानक आलेल्या ट्वीस्टमुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे. अभिराम आणि श्वेताच्या लग्नात श्वेताऐवजी नवरीच्या जागी लीला येऊन बसणार आहे. लीलाने स्वतःच अभिरामशी ठरलेलं लग्न मोडलं होतं. मात्र, ऐनवेळी लीला मंडपात येऊन बसल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. लीलाच्या येण्याने सगळेच गोंधळून गेले होते. तर, अभिराम लीलाने आपली फसवणूक केली असे समजून तिच्यावर चिडला आहे. त्याने तिला पत्नी म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. मात्र, अभिरामला आता लीलाला घरी घेऊनच जावं लागणार आहे.

रेवतीच्या जीवाची धमकी दिल्याने लीलाला अभिरामशी जबरदस्ती लग्न करण्यासाठी तयार झाली होती. ती स्वतः देखील या लग्नासाठी तयार नव्हती. मात्र, आपल्या बहिणीचा जीव धोक्यात आहे, हे पाहून लीला लग्नाला तयार झाली. मात्र, तिच्या वागण्याचा सगळ्यांनाच धक्का बसला. लीलाच्या वागण्यामुळे अभिराम देखील प्रचंड संतापला आहे. त्याने लग्न विधी तर पूर्ण केले. मात्र, लीलाची पुन्हा तिच्या माहेरी पाठवणी केली होती. आपला मुलगा सुनेशी असा वागतोय, हे बघून सरोजिनी आजीला खूप वाईट वाटलं. मात्र, आता त्यांनी लढवलेली शक्कल कामी येणार आहे. अभिरामला लीलाला जहागीरदारांच्या घरी घेऊन जावंच लागणार आहे.

सायली रविराज एकत्र येणार; अर्जुन-चैतन्यला निर्दोष सिद्ध करणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

अभिरामने दिली सुनांची साथ

लीलाने आपल्या घरात लग्न करून येऊ नये, म्हणून अभिरामच्या सूना दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांनी अनेक प्लॅन रचले होते. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. किशोर आणि विक्रांतच्या खेळीमुळे लीला जहागीरदारांची सून झाली. मात्र, अभिरामच्या सुनांनी तिला सासू म्हणून स्वीकारण्यास नकार दिला होता. तर त्यांनी लीलाला घरात घेण्यास देखील नाही म्हटलं होतं. तर, यावेळी अभिरामने देखील आपल्या सुनांची साथ दिली. यावर आता आजीने शक्कल लढवली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आजीची शक्कल कामी येणार

आजी आपलं घर सोडून लीलाच्या घरी जाऊन राहत होती. जोपर्यंत अभिराम स्वतः लीलाला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी देखील घरी येणार नाही, असा पण सरोजिनी आजीने केला होता. सुरुवातील अभिरामने याला नकार दिला. मात्र, आता तो आईचा हट्ट पूर्ण करण्यासाठी तयार झाला आहे. आता अभिराम आईला आणि लीलाला आणण्यासाठी मोहितेंच्या घरी जाणार आहे. यावेळी त्यांना कंकण सोडवण्याची विधी देखील पूर्ण करावी लागणार आहे. आता जहागीरदारांच्या घरी गेल्यावर लीलाला कशी वागणूक मिळणार, हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel