मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अभिरामच्या हळदीत लीलाला नाचावंच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये पुन्हा होणारा नवा गोंधळ

अभिरामच्या हळदीत लीलाला नाचावंच लागणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये पुन्हा होणारा नवा गोंधळ

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 15, 2024 04:08 PM IST

लीलाला अभिरामच्या हळदीत नाचावंच लागणार आहे. मात्र, या दरम्यान देखील लीलामुळे अभिराम जहागीरदारच्या घरात मोठा गोंधळ उडणार आहे.

अभिरामच्या हळदीत लीलालाच नाचावं लागणार!
अभिरामच्या हळदीत लीलालाच नाचावं लागणार!

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात अभिरामची हळद पाहायला मिळणार आहे. लीलाने अभिरामशी लग्न मोडल्यानंतर आता कालिंदी तिचं लग्न पुन्हा एकदा साळुंकेशी लावण्याचा प्रयत्न करणार होती. मात्र, लीलाने काम करून साळुंकेचे पैसे परत फेडण्याचा निर्णय घेतला आहे. इतकंच नाही, तर तिने कामाची शोधाशोध देखील सुरू केली होती. यावेळी तिच्या हातात एक जाहिरात लागली होती. या जाहिरातीनंतर लीलाने एका डान्स ग्रुपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या डान्स ग्रुपमध्ये एका इव्हेंटमध्ये काम करण्यासाठी लीलाला तब्बल तीन लाख रुपये मिळणार होते. या शोचा ऍडव्हान्स म्हणून तिला पन्नास हजार रुपयांचे मानधन देखील मिळाले.

ट्रेंडिंग न्यूज

लीलाने तिला मिळालेले हेच ५० हजार साळुंकेला देत पुन्हा पुढचे तीन महिने तरी माझ्या दारात फिरकू नकोस, अशी तंबी दिली. लीला कमवायला लागल्यामुळे आता सगळेच खुश झाले आहेत. मात्र, पहिल्याच दिवशी डान्स ग्रुपमध्ये रिहर्सलला उशिरा पोहोचल्यामुळे लीलाला ओरडा खावा लागला. आता आपण नक्की कुठे डान्स करणार आहोत, असा प्रश्न लीलाला पडला होता. तिने हा प्रश्न तिच्या मॅनेजरला विचारला देखील. मात्र, हे एक सीक्रेट आहे आणि हे आता कुणालाच सांगू शकत नाही, असं म्हणत तिने लीलाला गप्प केलं. डान्सची पूर्ण तयारी झाल्यानंतर आता लीला संपूर्ण ग्रुप सोबत कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचली आहे.

मधुभाऊंची केस सुटणार! सायली आणि अर्जुन एकमेकांपासून दुरावणार? ‘ठरलं तर मग’मध्ये पुढे काय घडणार?

कार्यक्रमाचं ठिकाण पाहून लीलाला बसणार धक्का!

कार्यक्रमाचे ठिकाण पाहताच आता लीलाला मोठा धक्का बसणार आहे. लीलाचा डान्स इतर कुठेही नसून, तो चक्क अभिरामच्या घरी असणार आहे. लीला अभिरामच्या हळदीच्या कार्यक्रमासाठी डान्सची तयारी करत होती, हे आता तिच्या लक्षात आल्यावर तिला मोठा धक्का बसणार आहे. आपण इथं डान्स करू शकत नाही, असं ती मॅनेजरला सांगत असतानाच मॅनेजर तिला कराराची आठवण करून देते की, ‘तू जर या कार्यक्रमात डान्स केला नाहीस, तर तुला तीन लाख रुपये दंड आणि पन्नास हजार रुपये दिलेला ऍडव्हान्स परत करावा लागेल.’ हे ऐकल्यानंतर आता लीलाकडे डान्स करण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय उरलेला नाही.

त्यामुळे आता लीलाला अभिरामच्या हळदीत नाचावंच लागणार आहे. मात्र, या दरम्यान देखील लीलामुळे अभिराम जहागीरदारच्या घरात मोठा गोंधळ उडणार आहे. आता हा गोंधळ काय असणार हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point