‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना यांना एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. पार्टीत अभिरामने आपलं नाव घेऊ नये, म्हणून लीलाने वचन घेतलं होतं. मात्र, उलट घडल्याने आता तिला चांगलाच धक्का बसला आहे. ‘मिस्टर परफेक्ट’ अभिराम जहागीरदार याने आपल्या होणाऱ्या बायकोचं नाव जाहीर करण्यासाठी एका जंगी पार्टीचा आयोजन केलं होतं. या पार्टीत त्याने लीला आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला देखील आमंत्रण दिलं होतं. रेवतीला विक्रांतच्या तावडीतून सोडवण्याच्या बदल्यात अभिराम याने लीलाकडून देखील एक वचन घेतलं होतं. आता लीलाला याच वचनाची पूर्ती करण्यासाठी अभिरामशी लग्न करावे लागणार आहे.
मात्र, ‘तुम्ही माझ्याशी लग्न करू नका. मी तुम्हाला अनुरूप नाही’, असं म्हणून लीलाने अभिरामचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अभिरामवर याचा काहीही फरक पडलेला नाही. लीलाने अभिरामकडून एक वचन घेतलेलं असतं की, तो पार्टीत लीलाचं नाव जाहीर करणार नाही. आणि म्हणूनच लीला आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत अभिरामच्या या पार्टीत गेली होती. मात्र, पार्टीत गेलेल्या लीलाला आता मोठा धक्का बसणार आहे. आपली होणारी बायको म्हणून अभिराम इतर कुणाचं नाही, तर लीलाच नावचं जाहीर करणार आहे. मात्र, लीलाला दिलेल्या वचनाप्रमाणे अभिराम स्वतः तिचं नाव जाहीर करणार नाही. तर, फाल्गुनीच्या तोंडून लीलाच नाव जाहीर करण्यात येणार आहे.
त्यामुळे अभिरामने पुन्हा एकदा लीलाला दिलेलं वचन पूर्ण होणार आहे. आता लीलाला अभिरामशी लग्न करावंच लागणार आहे. दुसरीकडे, अभिरामने लीलाला लग्नाची मागणी घातल्यामुळे तिची सावत्र आई अर्थात कालिंदी ही लीलावर प्रचंड खुश आहे लीलाच्या अंगावर असलेले दागिने बघून कालिंदीला पुन्हा एकदा संपत्ती आणि पैशाचा मोह जडला आहे. ती आता लीलावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. या लग्नासाठी लीलाने होकार द्यावा आणि अभिरामशी लग्न करावं म्हणून कालिंदी लीलाची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहे.
‘माझी मुलगी माझं मन कधीच मोडणार नाही’, असं म्हणून ती लीलाकडून लग्नासाठी होकार मिळवणार आहे. दुसरीकडे साळुंकेचं कर्ज फिटेल आणि आपल्यालाही पैसा मिळेल, या विचाराने कालिंदी खुश झाली आहे. मात्र, लीलाच्या वडिलांचा या लग्नाला विरोध आहे. ते सतत तिला हे लग्न तुला मान्य आहे का? असं विचारात आहेत. तर, आता सगळ्या गोष्टींचा विचार करून लीला आपण या लग्नाला मनापासून तयार असल्याचा घरच्यांना सांगणार आहे. दुसरीकडे, जहागीरदारांच्या घरात लग्नाची तयारी देखील सुरू झाली आहे. मात्र, अभिरामच्या तिन्ही सुनांना लीला त्यांची सासू म्हणून मान्य नाही. मालिकेच्या आगामी भागांमध्ये हे रंजक वळण पाहायला मिळणार आहे.