मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  लीला पुन्हा गोंधळ घालणार; अभिरामच्या अंगावर पाणी सांडणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

लीला पुन्हा गोंधळ घालणार; अभिरामच्या अंगावर पाणी सांडणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 12, 2024 03:10 PM IST

अभिरामने लीलाला दिलेलं वचन पूर्ण करून रेवतीला विक्रांतच्या तावडीतून सोडवले आहे. आता लीलाला अभिरामचं वचन पूर्ण करावं लागणार आहे.

लीला पुन्हा गोंधळ घालणार; अभिरामच्या अंगावर पाणी सांडणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?
लीला पुन्हा गोंधळ घालणार; अभिरामच्या अंगावर पाणी सांडणार! ‘नवरी मिळे हिटलरला’मध्ये आज काय घडणार?

नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना धमाल पाहायला मिळणार आहे. लीला पुन्हा एकदा तिचा गोंधळ घालायला सुरुवात करणार आहे. एकीकडे लीला सावत्र आईनं तिचं लग्न साळुंखे सोबत लावण्याचा विडा उचलला आहे. तर, दुसरीकडे आता अभिरामने लीलाला दिलेलं वचन पूर्ण करून रेवतीला विक्रांतच्या तावडीतून सोडवले आहे. आता लीलाला अभिरामचं वचन पूर्ण करावं लागणार आहे. या वचनाच्या बदल्यात अभिराम लीलाला लग्नाची मागणी घालणार आहे. मात्र, हे ऐकल्यानंतर आता लीला हादरून जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘तुमच्या आणि माझ्या वयात प्रचंड अंतर आहे. आपण दोघे एकमेकांना अनुरूप नाही. तुम्ही एकदम परफेक्ट आहात, तर मी वेंधळी आहे. मी सतत गोंधळ घालत असते. आपली जोडी कुठल्याच बाजूनी जमणार नाही. त्यामुळे अंकल प्लीज तुम्ही माझ्याशी लग्न करू नका. मी तुमच्याशी लग्न करणार नाही’, असं म्हणून लीला पुन्हा एकदा अभिरामकडून वचन घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, यावेळेस अभिराम एकही चकार शब्द बोलणार नाहीये. लीला अभिरामशी बोलून निघून गेल्यानंतर आता लीलाच्या घरी अभिराम जहागीरदारच्या पार्टीचे निमंत्रण पोहोचणार आहे.

अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर तातडीने अँजिओप्लास्टी; आता कशी आहे प्रकृती? जाणून घ्या...

बायकोचं नाव जाहीर करण्यासाठी अभिराम ठेवणार पार्टी

आपल्या होणाऱ्या बायकोचे नाव जाहीर करण्यासाठी अभिराम जहागीरदारने ही पार्टी ठेवली आहे. या पार्टीतच अभिराम आपण कुठल्या मुलीशी लग्न करणार आहोत, तिची ओळख सगळ्यांना करून देणार आहे. मात्र, अभिराम व्यतिरिक्त या मुलीबद्दल आता कुणालाच काहीही माहीत नाही. तर, लीलाने ‘आपलं नाव पार्टीत घेऊ नये’, असं अभिरामला बजावलं आहे. दुसरीकडे, पार्टीत पोहोचल्यावर लीला पुन्हा एकदा आपला वेंधळेपणा दाखवायला सुरुवात करणार आहे.

लीलाचा पुन्हा गैरसमज होणार!

अभिरामला फाल्गुनीशी बोलताना बघून पुन्हा एकदा लीलाचा गैरसमज होणार आहे. अभिराम बायको म्हणून फाल्गुनीची निवड करणार, असं वाटून आता लीला आपल्या बहिणीला हे सांगणार आहे. तर, इतक्यात तिचं बोलणं लक्ष्मी ऐकून सगळ्यांना सांगणार आहे. तर, आता बोलता बोलता लीलाच्या हातून पाणी थेट अभिरामच्या कोटवर पडणार आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा हे दोघं एकमेकांना भिडणार आहेत. ‘नवरी मिळे हिटलरला‘ या मालिकेच्या आजच्या भागात ही धमाल प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग