शिवसेनेचे दिवंगत नेते, ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आता या चित्रपटाचा पुढील भाग ‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ नावाने प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २७ सप्टेंबर रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला. रसिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला सर्वत्र मिळत आहे. अशातच जर तुम्ही आज धर्मवीर २ हा चित्रपट पाहायला जाणार असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण ही बातमी वाचल्याने तुमचा फायदा होणार आहे.
‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ हा चित्रपट सध्या १५००हून अधिक स्क्रीनवर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'नाथा घरच्या आनंदाची गोष्ट', 'व्हू इज एकनाथ शिंदे सांगणारी दिघेंच्या हिंदुत्वाची गोष्ट' , चरित्रपटातून प्रखर हिंदूत्वाचा जागर.... अशा शब्दांत समीक्षकांनीही चित्रपटाला गौरवले आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची उत्सुकता कायम आहे. नवरात्रीचे खास औचित्य साधुन "धर्मवीर २" हा चित्रपट रसिक प्रेक्षकांसाठी शुक्रवार ४ ऑक्टोबरला अवघ्या ९९ रुपयांमध्ये थिएटरला पाहण्याची अनोखी संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
धर्मवीर चित्रपटानंतर "धर्मवीर २" चित्रपटात नक्की काय दाखवले जाणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होती. त्याचेच प्रतिबिंब आपल्याला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षक प्रतिसादातून दिसून येत आहे. प्रेक्षकांना पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं या चित्रपटानं दिली असून, ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांना ती योग्य प्रकारे मिळाली आहेत. सिक प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद या चित्रपटाला सर्वत्र मिळत असून आजपर्यंत चित्रपटाने तब्बल १२.२८ कोटींचा गल्ला कमावला आहे.
महिला वर्गाचा चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद लक्षणीय असून चित्रपट पाहण्यासाठी संपूर्ण कुटुंबच चित्रपटगृहात जात असल्याचे चित्र दिसते आहे. केवळ मुंबई, ठाणे,पालघर नाही तर पुणे,कोल्हापुर, इचलकरंजी, नाशिक, छ.संभाजीनगर, मराठवाडा अशा संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये कलेक्शनमध्ये आणखी वाढ होईल यात शंका नाही.
वाचा: मुंबईतील 'या' शापित बंगल्याने उद्ध्वस्त केले तीन मोठ्या स्टार्सचे करिअर, वाचा कुठे आहे हा बंगला
‘धर्मवीर २ – साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई, उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. कथा,पटकथा,संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनीच निभावली असून कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम पाहिले आहे.
संबंधित बातम्या