मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Navra Mazha Navsacha 2 : ठरलं! 'हे' कलाकार दिसणार 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये

Navra Mazha Navsacha 2 : ठरलं! 'हे' कलाकार दिसणार 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये

Aarti Vilas Borade HT Marathi
Feb 06, 2024 10:45 AM IST

Navra Mazha Navsacha 2 : अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेता सचिन पिळगावकर यांचा 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आता या चित्रपटाचा दुसरा भाग येत असून कोणते कलाकार दिसणार हे समोर आले आहे.

Navra Mazha Navsacha 2
Navra Mazha Navsacha 2

Navra Mazha Navsacha 2 star Cast: मराठी चित्रपटसृष्टीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा.' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता प्रदर्शनाला २० वर्षे उलटल्यानंतर चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चाहत्यांसाठी सुखद धक्काच आहे. आता त्या पाठोपाठ चित्रपटात कोणते कलाकार दिसणार हे समोर आले आहे.

कोणते कलाकार दिसणार?

राजश्री मराठीने दिलेल्या वृत्तानुसार, 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात अभिनेते अशोक सराफ, निवेदिता सराफ, सिद्धार्थ जाधव, सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, वैभव मांगले, निर्मिती सावंत, जयवंत वाडकर, हेमल इंगळे, संतोष पवार आणि अली असगर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती सचिन पिळगावकर यांनी केली आहे. लवकरच चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही.
वाचा: संतोष जुवेकरने खरेदी केली नवी गाणी, आई-वडीलांनी दिली भेट

'नवरा माझा नवसाचा २'च्या शूटिंगला सुरुवात

ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांनी 'नवरा माझा नवसाचा २' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करणाच असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. "'नवरा माझा नवसाचा २'शुटिंगला उद्यापासून सुरुवात.. तुमचे आशीर्वाद असेच राहुद्या" या आशयाचे कॅप्शन त्यांनी सोशल मीडियावर दिले आहे.

'नवरा माझा नवसाचा' सिनेमा विषयी

'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट २००४ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती किट्टू फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत करण्यात आली आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ, सुनील तावडे, निर्मिती सावंत, किशोरी शहाणे, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर आणि विजय पाटकर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. आता 'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटात कोणते कलाकार दिसणार? चित्रपटाचे कथानक काय असणार? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

'नवरा माझा नवसाचा'मधील गाणी सुपरहिट

'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातील गाणी सुपरहिट ठरली होती. त्यामध्ये चला ना गडे, हिरवा निसर्ग हा भवतीने, चला जेजुरीला जाऊ, वेदशास्त्रामाजी हो मंगलमूर्ती या गाण्यांचा सहभाग आहे. या गाण्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

WhatsApp channel