Navra Maza Navsacha 2: दोन जोडपी अन् डबल धमाल! ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार गणपती बाप्पाची कमाल-navra maza navsacha 2 trailer out sachin and supriya pilgaonkar swapnil joshi starrer new marathi movie ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Navra Maza Navsacha 2: दोन जोडपी अन् डबल धमाल! ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार गणपती बाप्पाची कमाल

Navra Maza Navsacha 2: दोन जोडपी अन् डबल धमाल! ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये दिसणार गणपती बाप्पाची कमाल

Sep 04, 2024 08:29 PM IST

Navra Maza Navsacha 2 Trailer Video: प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Navra Maza Navsacha 2 Trailer
Navra Maza Navsacha 2 Trailer

Navra Maza Navsacha 2 Trailer Out: एसटी बस दिसली की आपल्यापैकी अनेकांच्या डोळ्यांसमोर अशोक मामांचा चेहरा येतो. यामागचं कारण म्हणजे ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट आहे. या चित्रपटात गणपतीपुळ्याला जाणाऱ्या ‘व्हर्जिनल गाडीचा व्हर्जिनल कंडक्टर’ बनून त्यांनी प्रेक्षकांचं भापूर मनोरंजन केलं होतं. अशोक सराफ यांच्यासोबत सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर या जोडीने देखील धमाल केली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. प्रेक्षकांमध्ये चर्चेत असलेल्या ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

मराठी सिनेसृष्टीला नवीन ऊर्जा देणारा चित्रपट म्हणून 'नवरा माझा नवसाचा २'ची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. या चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली होती होती. आता ही उत्सुकता शमवण्यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाची रिलीज डेट देखील जाहीर केली आहे. ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट येत्या २० सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

ट्रेलरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाच्या २.१६ मिनिटांच्या ट्रेलरमध्ये भरपूर धमाल पाहायला पाहायला मिळाली आहे. पहिल्या भागाप्रमाणेच या चित्रपटातही सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर यांची जोडी झळकणार आहे. तर, भागातही आता आणखी एक नवीन जोडी म्हणजेच स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे हे देखील पाहायला मिळाले आहेत. या जोडप्याचा गणपती बाप्पाच्या नवसाचा प्रवास आणि त्यातून निर्माण होणाऱ्या हास्यविनोदी घटनांची मालिका या चित्रपटात आणि ट्रेलरमध्ये पाहायला मिळणार आहे. यासोबतच, एका हिऱ्याच्या चोरीच्या गुन्ह्याचं थरारक कथानकही या चित्रपटात दिसणार आहे.

Navra Mazha Navsacha 2: ‘नवरा माझा नवसाचा २’मध्ये प्रेक्षकांना सरप्राईज मिळणार! सचिन पिळगावकर ‘हे’ गाणं गाणार

कलाकारांची भली मोठी फौज!

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे, गणेश पवार असे अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका निभावताना दिसणार आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते लिलीपुट यांनीही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.

काय असणार वेगळं?

पहिल्या भागापेक्षा या भागात काही वेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहे. यात दोन जोडप्यांची कथा दाखवली आहे. यामुळे चित्रपट अधिक मनोरंजक बनणार आहे. यासोबतच, गणपती बाप्पाच्या भक्तीची भावना आणि एका हिऱ्याच्या चोरीच्या गुन्ह्याचा थरार या दोन्ही घटकांना या चित्रपटाच्या कथेत गुंफण्यात आले आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांना एकाच वेळी हास्य, रोमांच आणि भावुक क्षण अनुभवता येणार आहेत.