Navra Maza Navsacha 2 Box Office: मराठी चित्रपटसृष्टीमधील बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘नवरा माझा नवसाचा २’ हा चित्रपट २० सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सचिन पिळगावकर, अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, स्वप्नील जोशी आणि इतर काही कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन १० दिवस उलटले आहेत. त्यामुळे चित्रपट हिट ठरत आहे की फ्लॉप ठरत आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईविषयी म्हणजे चाहत्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल.
मराठी सिनेसृष्टीला नवीन ऊर्जा देणारा चित्रपट म्हणून 'नवरा माझा नवसाचा २'ची सगळ्यांनाच प्रतीक्षा होती. या चित्रपटातील गाणी, डायलॉग आणि कलाकारांच्या भूमिका प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेताना दिसत आहेत. या चित्रपटाने दहा दिवसात बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. चला जाणून घेऊया चित्रपटाच्या कमाईविषयी...
'नवरा माझा नवसाचा २' या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात १४.३६ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तसंच शुक्रवार, शनिवार आणि रविवार ४.२१ कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटाने १८.५७ कोटींची कमाई केली आहे. यासंदर्भात सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे बजेट हे ८ कोटी रुपये होते. त्यामुळे चित्रपटाने चांगली कमाई केल्याचे समोर आले आहे.
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, सिद्धार्थ जाधव, अली असगर, विजय पाटकर, जयवंत वाडकर, संतोष पवार, हरिश दुधाडे, गणेश पवार असे अनेक प्रसिद्ध कलाकार महत्त्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते लिलीपुट यांनीही या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.
वाचा: पतीच्या निधनानंतर खचून गेल्या होत्या नीना कुलकर्णी, आज दोन्ही मुले आहेत करिअरमध्ये यशस्वी
‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात गणपती बाप्पाच्या भक्तीची भावना आणि एका हिऱ्याच्या चोरीच्या गुन्ह्याचा थरार या दोन्ही घटकांना या चित्रपटाच्या कथेत गुंफण्यात आले आहे. प्रेक्षकांना एकाच वेळी हास्य, रोमांच आणि भावुक क्षण अनुभवता येत आहेत.