Navari Mile Hitler La: तीन सुना मिळून शोधणार कुटुंबासाठी परफेक्ट सासू! ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Navari Mile Hitler La: तीन सुना मिळून शोधणार कुटुंबासाठी परफेक्ट सासू! ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांच्या भेटीला

Navari Mile Hitler La: तीन सुना मिळून शोधणार कुटुंबासाठी परफेक्ट सासू! ‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांच्या भेटीला

Published Mar 18, 2024 12:15 PM IST

Navari Mile Hitler La Marathi Serial Update: ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आजपासून दररोज रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांच्या भेटीला
‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांच्या भेटीला

Navari Mile Hitler La Marathi Serial Update: मनोरंजन विश्वात विशेषतः छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी आता काही नव्या मालिका सज्ज झाल्या आहेत. यातच आता ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेला आजपासून म्हणजेच १८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतून काही जुनेच आणि गाजलेले कलाकार एका वेगळ्या आणि हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. आपल्या हिटलर पण तरुण सासऱ्यासाठी सासू शोधायला निघालेल्या तीन सुनांची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक मालिका पाहण्यासाठी आतुर झाले आहेत.

‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिका आजपासून दररोज रात्री ९.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेच्या प्रोमोने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे. मालिकेच्या या टीझर प्रोमोमध्ये सासऱ्याचा अर्थात अभिनेता राकेश बापट साकारत असलेल्या पात्राचा ‘हिटलर’ अंदाज पाहायला मिळाला आहे. ‘नवरी मिळे हिटलरला’ या नावात ज्याप्रकारे हिटलरचा उल्लेख केला गेला आहे, त्याच प्रकारे या मालिकेतील मुख्य पात्र म्हणजेच अभिराम हा देखील अगदी हिटलर आहे. प्रत्येक गोष्टीत परफेक्शन लागणारा अभिरामच्या आयुष्यात बिनधास्त पण धसमुसळी लीला एन्ट्री करणार आहे. आता या लीलाशी अभिरामचं सूत जुळेल का? हे मालिकेत पाहायला मिळणार आहे.

Tharala Tar Mag 18th Mar: सायलीला अर्जुनपासून दूर करण्याचा नवा डाव; महिपत आणि साक्षी खेळणार नवी चाल

आम्ही शोधणार परफेक्ट सासू!

‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या प्रोमो व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तीन सुना आपल्या सासऱ्यासाठी एक परफेक्ट बायको आणि आपल्या घरासाठी एक परफेक्ट सासू निवडण्यासाठी एका कार्यक्रमात निघाल्या आहेत. आपल्याला एक परफेक्ट सासू मिळावी यासाठी त्यांनी चक्क एका कार्यक्रमाचे आयोजन करून, तिथे सगळ्या मुलींना बोलावलं आहे. ‘मिस्टर हिटलर’ म्हणजेच मालिकेतील ‘अभिराम’ला त्याच्या बिजनेस व्यतिरिक्त दुसरे काहीही सुचत नाही. मात्र, अभिरामच्या आईची अशी इच्छा आहे की, त्याने लग्न करून आपल्या आयुष्यात आनंदी व्हावे. यासाठी या तीन सुनांनी वेगळाच खटाटोप मांडला आहे. आता या तीन तरुण स्त्रिया, वयाने तरुण असलेल्या अभिरामच्या सुना कशा काय असू शकतात? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. प्रेक्षकांना पडलेल्या याच प्रश्नाचं उत्तर मालिकेच्या आजच्या पहिल्या भागात मिळू शकणार आहे.

Neena Kulkarni Serial: छोट्या पडद्यावर पुन्हा एका नव्या मालिकेची एंट्री! नीना कुळकर्णींचं धमाकेदार कमबॅक

कोण कोण झळकणार?

‘नवरी मिळे हिटलरला’ या नव्याकोऱ्या मालिकेत हिंदी मनोरंजन विश्व गाजवणारा अभिनेता राकेश बापट मुख्य भूमिकेत दिसणार आहे. राकेश बापट याला मराठीत पाहण्यासाठी त्याचे चाहते देखील आतुर झाले आहेत. यासोबत या मालिकेत वल्लरी शिंदे, भुमिजा पाटील, शर्मिला शिंदे आणि सानिका काशीकर या देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.

Whats_app_banner