Nava Gadi Nava Rajya 23rd October 2023 Serial Update: 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत आता एक धक्कादायक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आनंदी आई होऊ शकत नाही, हे सत्य गेले कित्येक दिवस आनंदी आणि राघव यांनी सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. मात्र, आता राघवची आई म्हणजेच सुलक्षणा हिच्या हाती आनंदीचे मेडिकल रिपोर्ट्स लागणार आहेत. तर, सुलक्षणा आता ते रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांकडे जाणार आहे. त्यावेळी डॉक्टरांकडून सुलक्षणाला हे सत्य कळणार आहे.
सुलक्षणा घरात असताना तिला एक मेडिकल रिपोर्ट्सची फाईल मिळणार आहे. त्या फाईलवरून ती आनंदीची असल्याचं तिला कळणार आहे. इतके दिवस आनंदीला नक्की काय झालंय, याबद्दल कुणालाच काही माहित नव्हतं. सगळ्यांनी विचारून देखील आनंदी आणि राघव यांनी कुणालाही कशाचाही थांगपत्ता लागू दिला नाही. मात्र, आता तेच सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. यानंतर आता सुलक्षणा आनंदीवर नाराज होणार आहे. मात्र, यामुळे आता कर्णिकांच्या घरात मोठं वादळ येणार आहे. एकीकडे आनंदीला बाळ व्हावं म्हणून सगळेच देव पाण्यात ठेवून बसले आहे. सगळे उपास तापास देखील सुरू झाले आहेत.
आनंदीला मुलं व्हावं म्हणून सुलक्षणाने तिला नवरात्रीचं व्रत करायला लावलं होतं. मात्र, आता सुलक्षणाला हे सत्य कळल्यानंतर तिला मोठा धक्का बसणार आहे. यानंतर आता ती आनंदी आणि राघव यांच्यावर रागवणार आहे. आनंदीला मुलं होत नाही, म्हणून आता तिच्या सासूने म्हणजे राघवच्या आईने तिला नवरात्रीचं व्रत करायला लावलं होतं. मात्र, या सगळ्याला राघवचा विरोध होता. यामुळे आता आनंदी राघवपासून लपून हे व्रत करण्याचा प्रयत्न करत होती. आई होण्यासाठी आनंदी आता काहीही करायला तयार होती. आपण आई होऊ शकत नाही, हे सत्य अजूनही आनंदीने स्वीकारलेलं नाही.
रमामुळे आनंदी अपत्य सुखापासून वंचित राहिली आहे. आपल्यामुळे आनंदी आई होऊ शकत नाहीये, हे आता रमाला कळलं आहे. मात्र, आनंदीच्या पदरी हे सुख पडावं म्हणून रमा सातत्याने झगडत आहे. यासाठी आता तिने यासाठी थेट चित्रगुप्ताशी देखील वाद घातला आहे. चित्रगुप्ताचं मन वळवून आता रमा पृथ्वीवर परत आली आहे. ती आता आनंदीला या सगळ्या दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे.
संबंधित बातम्या