Nava Gadi Nava Rajya: योजनाला गणपती देऊन आनंदी पडलीये पेचात; चिंगीचा बाप्पा आता कसा येणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nava Gadi Nava Rajya: योजनाला गणपती देऊन आनंदी पडलीये पेचात; चिंगीचा बाप्पा आता कसा येणार?

Nava Gadi Nava Rajya: योजनाला गणपती देऊन आनंदी पडलीये पेचात; चिंगीचा बाप्पा आता कसा येणार?

Sep 20, 2023 07:36 PM IST

Nava Gadi Nava Rajya 20 September 2023: आनंदीने योजनाची अडचण जाणून घेऊन मोठ्या मनाने तिची स्वतःच्या घरासाठी बनवलेली गणपती बाप्पाची मूर्ती योजना आणि तिच्या मुलाच्या हाती सोपवली.

Nava Gadi Nava Rajya
Nava Gadi Nava Rajya

Nava Gadi Nava Rajya 20 September 2023: नवा गडी नवं राज्य’मध्ये आता एक नवा ट्वीस्ट बघायला मिळणार आहे. आता राघव आणि आनंदी यांच्या संसारावरील संकट टळलं आहे. योजनाने तिचे सगळे आरोप मागे घेतले असून, तिने आपण राघववर खोटे आरोप केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता राघव कर्णिक सगळ्या आरोपातून मुक्त झाले आहेत. आता राघव पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात पूर्वपदावर आला आहे. आता आनंदी आणि राघव यांच्या घरात देखील गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे.

आनंदी स्वतः स्वतःच्या हाताने मुर्त्या घडवते. आता सगळा आयुष्यातील गोंधळ आवरल्यानंतर आनंदी आणि राघव पुन्हा एकदा त्यांच्या कामावर परतले आहेत. आता आनंदी तिच्या सगळ्या ऑर्डर्स पूर्ण करता आहे. तिने सगळ्यांचे गणपती पूर्ण केल्यानंतर तिच्या घरासाठी आणि नंदूच्या आईच्या घरासाठी देखील मूर्ती बनवली. चिंगीने आनंदीकडे या वर्षी आपल्या घरातील गणपती बाप्पाची मूर्ती कशी असावी, याची कल्पना सांगितली होती. या कल्पनेतूनच आनंदीने त्यांच्या घराची बाप्पाची मूर्ती घडवली होती.

Filmy Nostalgia: एकही गणपती न पाहता जगदीश खेबुडकरांनी लिहिलेलं ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा..’ गाणं!

मात्र, सगळं काम आता पूर्ण झाल्यानंतर योजना अचानक राघव आणि आनंदीच्या कारखान्यात येऊन पोहोचली आहे. योजनाला असं अचानक बघून ते दोघेही गोंधळून गेले होते. मात्र, तिने आपल्या येण्याचं कारण आता स्पष्ट केलं आहे. योजना आनंदीकडे गणपतीची मूर्ती घेण्यसाठी आली होती. बदनामी झाल्यामुळे योजनाला कुणीच गणपती मूर्ती देत नव्हते. यामुळेच तिने आनंदीकडे जाण्याचा निर्णय घेतला होता.

आनंदीने देखील योजनाची अडचण जाणून घेऊन मोठ्या मनाने तिची स्वतःच्या घरासाठी बनवलेली गणपती बाप्पाची मूर्ती योजना आणि तिच्या मुलाच्या हाती सोपवली. आनंदीने ही बाप्पाची मूर्ती योजनाला दिली खरी, पण आता बापा आपल्या घरी घेऊन जाण्यासाठी मिरवणूक घेऊन आलेल्या चिंगीला ती नवी मूर्ती कुठून देऊ शकेल हा प्रश्न निर्माण झाला आहे. आता आनंदी नवी मूर्ती घडवेल की, चिंगीची समजूत काढेल, हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.

Whats_app_banner