Nava Gadi Nava Rajya 15 September 2023: आनंदी आता आपल्या पती राघवला संकटातून बाहेर काढण्यासाठी मोठी योजना बनवणार आहे. आपल्या पाटीवर म्हणजेच राघववर योजना नावाच्या एका मुलीने अतिशय गंभीर आरोप लावले होते. आता याच आरोपातून राघवला बाहेर काढण्यासाठी आनंदी एक मोठं प्लानिंग करणार आहे. या प्लॅनिंगनुसार आता ती राघवला योजनाकडे पाठवणार आहे. परंतु, यामागे आनंदी आता एक नवा डाव रचणार आहे. योजनाची योजना आता आनंदी तिच्यावरच उलटून लावणार आहे.
आपल्या नवऱ्यावर इतके गंभीर आरोप का लावले हे विचारण्यासाठी आनंदी योजनाकडे गेली होती. यावेळी योजना आनंदीसमोर एक अट ठेवणार आहे. योजना आनंदीला सांगणार आहे की, ‘तुझ्या नवऱ्याने येऊन माझ्या पायावर नाक घासून माफी मागितली पाहिजे. तरच मी त्याच्यावरचे आरोप मागे घेईन.’ यानंतर आता ननाद खूप विचार करून तिला यासाठी होकार देणार आहे. तर, पोलीस तक्रार करायला जाणाऱ्या राघवला रोखून ती यासाठी राजी करते. आता आनंदीच्या आनंदासाठी राघव देखील तिची ही मागणी मान्य करणार आहे. मात्र, आता आनंदीच्या डोक्यात एक नवी कल्पना येणार आहे.
आनंदीने आता राघवला योजनाची माफी मागणीसाठी राजी तर केलेच आहे. पण, योजनाने राघवने एकट्यानेच यावं अशी अट घातली आहे. यामुळे या प्रकरणात काहीतरी वेगळं घडत असल्याची कुणकुण आनंदीला लागली आहे. आता आनंदी योजनाची पार्श्वभूमी शोधून काढणार आहे. योजना नक्की कोण आहे? आणि ती राघववरच का आरोप करत आहे? यामागचं कारण आता आनंदी शोधून काढणार आहे. यासाठी आता आनंदीकडे केवळ एका रात्रीचा वेळ आहे. योजना माफी मिळवण्यासाठी नक्कीच हा डाव खेळत नाहीये, याची कल्पना आनंदीला आली आहे.
योजना ही तिच्या माहेरचं नाव वापरून या डाव खेळत आहे, हे देखील आनंदीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे आता राघवच्या ऑफिसमधील कागदपत्रांच्या आधारे ते योजनाची माहिती काढणार आहे. आणि यानंतर एक योजना बनवूनच ती राघवला तिच्या घरी पाठवणार आहे. आता मालिकेत पुढे नेमकं काय घडणार? राघव योजना समोर गेल्यावर ती काय प्रतिक्रिया देणार? हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.
संबंधित बातम्या