Nava Gadi Nava Rajya 12th Oct: रमाची नि:स्वार्थ मदतही राघवला नकोशी; ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये ट्विस्ट
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nava Gadi Nava Rajya 12th Oct: रमाची नि:स्वार्थ मदतही राघवला नकोशी; ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये ट्विस्ट

Nava Gadi Nava Rajya 12th Oct: रमाची नि:स्वार्थ मदतही राघवला नकोशी; ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये ट्विस्ट

Updated Oct 12, 2023 07:20 PM IST

Nava Gadi Nava Rajya 12th October 2023 Serial Update: रमाच्या येण्याने आनंद होण्याऐवजी, ती पुन्हा का आली असा सवाल राघव करणार आहे.

Nava Gadi Nava Rajya
Nava Gadi Nava Rajya

Nava Gadi Nava Rajya 12th October 2023 Serial Update:नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत आता प्रेक्षकांना एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता रमा आणि राघव यांच्यातील नातं बिघडताना दिसणार आहे. रमा पृथ्वी तलावर परतून आली आहे. तिच्या येण्याबद्दल आता राघवला देखील कळलं आहे. मात्र, रमाचं आपल्या आणि आनंदीच्या आयुष्यात पुन्हा येणं राघवला रुचलेलं नाही. रमाच्या येण्याने आनंद होण्याऐवजी, ती पुन्हा का आली असा सवाल राघव करणार आहे. हे ऐकून आता रमाला वाईट वाटलं आहे. मात्र, याऐवजी ती आता राघवला मदत करणार आहे.

राघवने नुकतीच स्वतःची कंपनी सुरू केली आहे. योजनाच्या प्रकरणामुळे राघवला नवी नोकरी मिळेनाशी झाली होती. अखेर आनंदीच्या हट्टापायी राघवने स्वतःची फर्म सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. अखेर त्याचं हे स्वप्न देखील पूर्ण झालं. त्याचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाटकर बाबांनी आर्थिक मदत केली. तर, आनंदीने त्याच्या खांद्याला खांदा लावून यासाठी राघवची मदत केली. आता राघवने स्वतःचं काम देखील सुरू केलं आहे. मात्र, त्याच्या या कामाला हवा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्याची हीच अवस्था बघून आता रमा त्याच्या मदतीला धावून येणार आहे.

Sara Kahi Tichysathi 12th Oct: निशी आणि ओवीची मैत्री रघुनाथरावांना मान्य नाही; काय असेल खोतांचं पुढचं पाऊल?

रमा आता पृथ्वीवर परतून आली आहे. इतकंच नाही तर, तिने आता आनंदीला तिच्या दुःखातून बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न देखील सुरू केले आहेत. या दरम्यान ती आनंदी आणि राघव यांना शक्य ती सगळी मदत करत आहे. राघवका कामात यश येत नाही हे बघून रमा आता आपल्या जादूने त्याच्या फर्ममध्ये नव्या क्लायंटची रांग लावणार आहे. आपल्या नव्या कामाला यश मिळताना पाहून आता राघव देखील आनंदी झाला आहे. यात रमाचा कोणताही वैयक्तिक स्वार्थ नाही. मात्र, आता राघवला ही गोष्ट कळणार आहे.

आनंदी राघवला रमा परतून आल्याची बातमी सांगणार आहे. तर, ही बाहेर लागलेली गर्दी त्यांच्यामुळेच आली आहे आणि ही तिचीच करामत असल्याचे आनंदी राघवला सांगणार आहे. आनंदीचं हे बोलणं ऐकून आता राघव चिडणार आहे. तर, मला तिच्या मदतीची गरज नाही, ती परतून का आली, असं चिडून राघव बोलणार आहे.

Whats_app_banner