Prashant Damle : मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! अभिनेते प्रशांत दामले असं का म्हणाले? वाचा...
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Prashant Damle : मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! अभिनेते प्रशांत दामले असं का म्हणाले? वाचा...

Prashant Damle : मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय! अभिनेते प्रशांत दामले असं का म्हणाले? वाचा...

Jan 06, 2024 04:12 PM IST

Prashant Damle At Natya Sammelan 2024: ‘अखिल भारतीय नाट्य संमेलना’चं हे १००वं वर्ष आहे. हे संमेलन पुण्यात पार पडत आहे.

Prashant Damle At Natya Sammelan 2024
Prashant Damle At Natya Sammelan 2024

Prashant Damle At Natya Sammelan 2024: मराठी कलाकारांचा दिवाळी-दसरा मानला जाणारा ‘अखिल भारतीय नाट्य संमेलन २०२४’ला आता सुरुवात झाली आहे. यंदा या ‘अखिल भारतीय नाट्य संमेलना’चं हे १००वं वर्ष आहे. यंदाच्या नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद ‘रंगमंचाचे बादशहा’ अभिनेते प्रशांत दामले यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. १००वं अखिल भारतीय नाट्य संमेलन पुण्यात पार पडत आहे. या ऐतिहासिक नाट्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर आता अभिनेते प्रशांत दामले यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘१००व्या नाट्य संमेलनात पहिल्यांदाच अध्यक्षपद मिळाल्याने मला मुख्यमंत्री झाल्यासारखं वाटतंय’, अशी प्रतिक्रिया अभिनेते प्रशांत दामले यांनी दिले आहे. यावेळी त्यांनी कलाकार मंडळींच्या मनातील भावना देखील व्यक्त केल्या आहेत. ‘आम्ही सगळेच कलाकार मंडळी तीन तास नाटकासाठी रंगमंचावर असतो. पण, अगदी २४ तास ३६५ दिवस अभिनय करणारी मंडळीही मंचावर आहेत. त्यांच्या कार्याला सलाम आहे. शासनाने दिलेला निधी आपण विचारपूर्वक आणि योग्य पद्धतीने वापरायला हवा. तर, शासनाने देखील भविष्यात योग्य त्या उपाययोजना पुरवळ्या पाहिजेत. रसिक प्रेक्षकांनी पुढच्या पिढीत नाटकाचा गोडवा निर्माण करायला हवा’, असे प्रशांत दामले म्हणाले.

AR Rahman: नावासोबतच एआर रहमान यांनी बदलला होता धर्म! तुम्हाला ‘या’ गोष्टी माहीत आहेत का?

यावेळी नाट्य संमेलनाच्या मंचावरून प्रशांत दामले यांनी कलाकारांच्या अडचणी देखील मांडल्या. तर, या मंचावर बोलताना ते सरकारला उद्देशून म्हणाले की, ‘नाट्यगृह बांधणे आणि त्यांची सुव्यवस्था राखणे सोपे काम आहे. नुकतीच सांस्कृतिक मंत्र्यांनी ७० नाट्यगृह बांधणार असल्याची घोषणा केली होती. हे ऐकून आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. फक्त ते सुव्यवस्थित राहतील याकडे लक्ष द्यायला हवं. नाट्यगृहाचे दर याशिवाय आतमध्ये सुविधांची जी कमतरता आहे, त्याकडेही लक्ष द्यायला हवं.’

प्रशांत दामले हे १००व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. अखिल भारतीय नाट्य संमेलन २०२४ हे ६ आणि ७ जानेवारी २०२४ रोजी पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये पार पडणार आहे. या नाट्य संमेलनासाठी कलाकार मंडळी पुण्यात पोहोचली आहेत.

Whats_app_banner