ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसोहळ्यात दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दिल्लीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडताना दिसत आहे. हाताला फ्रॅक्चर असूनही मिथुन चक्रवर्ती स्वत: पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते आणि यावेळी ते स्वत:ला भावूक होण्यापासून रोखू शकले नाहीत. त्यांचा पुरस्कार घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफाव व्हायरल झाला आहे.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारसोहळ्यात मिथुन चक्रवर्ती यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर ते आधार घेऊन खुर्चीवरून उठले आणि तत्कालीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांचा व्यासपीठावर सत्कार केला. मिथुन चक्रवर्ती यांच्या डोळ्यात आनंदाश्रू स्पष्ट दिसत होते. हा पुरस्कार स्वीकारताना मिथुन चक्रवर्ती म्हणाले की, 'कदाचित मला आयुष्यात जितका त्रास झाला आहे त्याची देवाने परतफेड केली आहे.'
दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर मिथुन चक्रवर्ती यांनी राष्ट्रपती मुर्मू आणि बसलेल्या प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. समारंभापूर्वी आनंद व्यक्त करताना मिथुन म्हणाले की, 'माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. ही खूप मोठी गोष्ट आहे. मी फक्त देवाचे आभार मानू शकतो. मी आयुष्यात जो संघर्ष केला आहे त्याचे देवाने मला फळ दिले आहे. आजही माझ्यासाठी हे स्वप्नवत आहे. या गोष्टी सत्य आहेत यावर माझा विश्वास बसत नाही.'
वाचा: पहिल्या पत्नीला दागिन्यांसह दिला अग्नी, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पहिल्या पत्नीविषयी माहिती आहे का?
मिथुन चक्रवर्ती यांनी इंडिया टुडेशी बोलताना आयुष्यातील संघर्षाविषयी सांगितले आहे. ते म्हणाले की, "करिअरच्या सुरुवातीच्या काळात मला सतत पैशांची गरज असायची. माझे एक मोठे कुटुंब होते. या कुटुंबाची जबाबदारी संपूर्ण माझ्यावर होती. त्यामुळे माझ्यावर खूप दबाव असायचा. पण आता काळ बदलला आहे. मी आता त्या गोष्टींचा विचार करत नाही. मी असे चित्रपट करण्याचा विचार करतो जे मला सर्जनशीलतेने समाधान देतात आणि यापेक्षा जास्त काही नाही.' मिथुन यांना एप्रिलमध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
संबंधित बातम्या