National Cinema Day: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?-national cinema day offer watch cinema in 99 rupees ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  National Cinema Day: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?

National Cinema Day: प्रेक्षकांसाठी खुशखबर! ९९ रुपयांमध्ये पाहा मल्टीप्लेक्समध्ये सिनेमा, वाचा कधी आणि कुठे?

Aarti Vilas Borade HT Marathi
Sep 18, 2024 02:06 PM IST

National Cinema Day Offer: राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने प्रेक्षकांसाठी एक खास ऑफर आणली आहे. ९९ रुपयांमध्ये तुम्ही चित्रपट पाहू शकता. चला जाणून घेऊया कधी आणि कुठे पाहायला मिळणार?

National Cinema Day
National Cinema Day

National Cinema Day Offer: राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया दरवर्षी काही तरी नवीन उपक्रम राबवत असते. यंदाही सिनेरसिकांना खास भेट देण्याचा निर्णय मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने घेतला आहे. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या मल्टीप्लेक्समध्ये केवळ ९९ रुपयांमध्ये चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. जवळपास ४००० हून अधिक स्क्रीनवर ही योजना लागू करण्यात येणार आहे. सिनेरसिकांसाठी हा एक जॅकपॉटच ठरणार आहे.

कधी पाहायसा मिळणार ९९ रुपयांमध्ये तिकिट?

एमएआयने यावर्षी राष्ट्रीय चित्रपट दिनासाठी स्वस्त तिकिटे देखील जाहीर केली आहेत. मात्र, हा करार थ्रीडी, रेक्लिनर किंवा ४डीएक्स, आयमॅक्सला लागू होणार नाही. २० सप्टेंबर २०२५ रोजी तुम्ही ९९ रुपये भरून चित्रपट पाहू शकाल. सध्या काही नवे जुने सिनेमे थिएटरमध्ये आहेत, जे पाहणे चुकले असेल तर आता कमी किमतीत पाहू शकता.

तरण आदर्श यांनी दिली माहिती

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनीही ट्विट करत ही गुड न्यूज दिली आहे. 'राष्ट्रीय चित्रपट दिन २०२४ ची घोषणा करण्यात आली आहे. शुक्रवार, २० सप्टेंबर २०२४ रोजी ४००० हून अधिक स्क्रीनवर हा दिवस साजरा केला जाणार आहे. यावेळी तिकिटांची किंमत ही केवळ ९९ रुपये असणार आहे' या आशयाचे ट्विट तरण आदर्श यांनी केले आहे. हे ट्विट पाहून सिनेरसिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
वाचा: अभिजीत सावंतने केली शाहरुख खानची नक्कल, वर्षा उसगावकरांनी केले कौतुक

कोणते चित्रपट पाहायला मिळणार?

'द बकिंगहॅम मर्डर', 'तुंबाड', 'लैला मजनू', 'स्त्री २', 'खेल-खेल में', 'वीर झारा', 'रहना है तेरे दिल में' हे सिनेमे तुम्ही यावेळी चित्रपटगृहात पाहू शकता. तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे तिकिटे घेऊ शकता. त्यामुळे ९९ रुपयांमध्ये तिकिट पाहण्यासाठी प्रेक्षक किती गर्दी करतात हे पाहण्यासारखे आहे.

Whats_app_banner
विभाग