Nathani Pahije Trending Marathi Song :महाराष्ट्रात दागिन्यांमध्ये नाकातील नथीचं स्थान अद्वितीय आहे. एक स्त्रीच्या सौंदर्याला नथीचा खास ठाव आहे,जो तिच्या रूपाला चार चाँद लावतो. हल्ली नथीच्या नखऱ्यांमध्ये एक नवीन फॅडसुद्धा पहायला मिळतंय. त्यातच आता'नथणी पाहिजे'या रोमँटिक गाण्याने एक वेगळाच ठसा उमठवला आहे. सध्या हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंडिंगला आलं आहे आणि त्याच्या लयबद्ध ठेक्यावर तरुणाई ठेका धरत आहे. या गाण्याने सगळ्यांना भुरळ घातली आहे.
गाण्याची कथा प्रत्येक मुलीच्या स्वप्नातील राजकुमारावर आधारित आहे. या गाण्यातील प्रेमिका जेव्हा आपल्या राजकुमारासमोर येते,तेव्हा तिच्या मनात एक गोष्ट असते, ती म्हणजे - नथ आणि प्रेम. या दोन गोष्टींसाठी ती राजकुमाराकडे खास मागणी करते. आता प्रश्न असा आहे,की नथ तिच्या हाती येणार का?आणि राजकुमार तिच्या प्रेमात पडणार का? हे एक सुंदर कथानक रोमँटिक पद्धतीने या गाण्यात चित्रित करण्यात आलं आहे.
या गाण्याची संकल्पना रोहित जाधव यांच्याशी संबंधित आहे.'नथणी पाहिजे'गाण्यात प्रेमाची एक निराळी कहाणी दाखवण्यात आली आहे. नथ हा एक महत्त्वाचा दागिना असतो,ज्यामुळे प्रत्येकाच्या हृदयात एक विशेष जागा असते. गाण्यात नथीच्या मागे असलेल्या भावनांचा सखोल अभ्यास केला गेला आहे,ज्यामुळे ती प्रेमिकेला राजकुमाराकडे आकर्षित करते. सर्वेश आणि रुपेश यांचं संगीत या गाण्यातून श्रोत्याला एक अद्वितीय अनुभव देते, ज्यामुळे या गाण्याला एक खास महत्त्व प्राप्त झालं आहे. निक आणि सुहानी यांचा संगम पाहून रसिकांना प्रेमाच्या गोड क्षणांची अनुभूती मिळते. त्यांच्या परफॉर्मन्समध्ये एक गोडवा आहे,जो पाहणाऱ्यांना मंत्रमुग्ध करतो.णीणी
‘नथणी पाहिजे’ हे गाणं संगीत दिग्दर्शक सर्वेश साबळे आणि रुपेश शिरोडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. गाण्याचे शब्द सोनाली सोनावणे आणि केवल वलंज यांच्या सुरात रेकॉर्ड झाले आहेत. रोहित जाधव यांनी या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. या गाण्यात निक शिंदे आणि सुहानी पगारे यांनी आपला अनोखा अंदाज दाखवला आहे,ज्यामुळे गाणं आणखी खास बनलं आहे. ‘नथनी पाहिजे’ हे गाणं'इंद्राक्षी म्युझिक' या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे. प्रेम,नथ,आणि सौंदर्य यांची अद्भुत कथा अनुभवण्यासाठी हे गाणं नक्की बघयला पाहिजे. नथीचं महत्व आणि प्रेमाची कहाणी यांचा संगम या गाण्यात दिसतो,जो प्रत्येकाच्या हृदयात ठसा उमठवतो. सोबतच 'नथनी पाहिजे'हे गाणं एक रोमँटिक अनुभव देतं,जो तरुणाईसाठी खूप खास आहे.
संबंधित बातम्या