Hardik pandya: क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि पूर्व पत्नी नताशा स्टॅनकोविच यांचा मुलगा अगस्त्य घटस्फोटानंतर पहिल्यांदाच मुंबईत परतला आहे. मुंबईत परतल्यानंतर अगस्त्य मंगळवारी वडील हार्दिक पांड्याच्या घरी पोहोचला आहे. हार्दिकची वहिनी पंखुडी शर्माने अगस्त्य आणि कृणाल पांड्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
पंखुडीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला अगस्त्य आणि कृणाल पांड्याचा मुलगा कवीरसोबत वेळ घालवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती आपल्या मांडीवर बसलेल्या कवीर आणि अगस्त्याला कथा सांगत आहे. कवीर आणि अगस्त्य पंखुरीसोबत या मजेदार क्षणाचा आनंद घेताना दिसत आहेत. पंखुरीने शेअर केलेल्या व्हिडीओचा हा फोटो आहे.
हार्दिक आणि अगस्त्य भेटले आहेत की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही? कारण त्यांच्या भेटीचा फोटो किंवा व्हिडीओ अद्याप समोर आलेला नाही. हार्दिकने त्याच्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही. या उलट नताशाने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटवर अगस्त्यचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तो कवीर आणि इतर लहान मुलांसोबत पांड्यांच्या घरी वाळूत खेळताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल झाले आहेत.
वाचा: वन नाईट स्टँडपासून सुरू झाली 'या' कपलची लव्हस्टोरी, अभिनेत्रीने केले आहे शाहरुखसोबत काम
दीड महिन्यांपूर्वी अगस्त्य आई नताशासोबत सर्बियाला गेला होता. सर्बियाला गेलेल्या नताशाने सतत अनेक फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न केला. तसेच नताशाचे अपडेट जाणून चाहत्यांना खूप आनंद झाला. अगस्त्य आणि नताशा परदेशात गेल्यानंतर त्यांनी घटस्फोटाची घोषणा केली होती. दोघांनीही त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर याबाबत पोस्ट शेअर केली होती. हे दोघे मिळून आपल्या मुलाचे संगोपन करणार असल्याचे पोस्टमध्ये सांगण्यात आले होते.