बॉलिवूड इंडस्ट्रीमधील दिग्गज कलाकारांच्या यादीमध्ये नसीरुद्दीन शाह यांचे नाव घेतले जाते. पण ते त्यांच्या चित्रपटांपेक्षा जास्त वादग्रस्त विधानांमुळे ओळखले जातात. ते सतत सामाजिक विषयांवर मत मांडताना दिसतात. नुकताच नसीरुद्दीन शाह यांनी एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी लोकसभा निवडणूकीवर मत मांडले असून भविष्यात पंतप्रधान कसा असावा हे सांगितले आहे. दरम्यान, त्यांनी काही जुन्या घटनांचा उल्लेख केला आहे.
मुलाखतीमध्ये नसीरुद्दीन शाह यांना विचारण्यात आले की, गेल्या आठवड्यात भाजपला बहुमत मिळाले नाही, १० वर्षात त्यांनी चांगले काम केलेले नाही आणि यूतीची गरज आहे हे जेव्हा तुम्हाला कळाले तेव्हा तुमच्या डोक्यात पहिला विचार काय आला? या प्रश्नावर उत्तर देत नसीरुद्दीन म्हणाले की, 'सगळ्यात आधी तर बरे वाटले. त्यानंतर मी स्वत:ला सांगत होतो की हरणारे, जिंकणारे, हिंदू, मुस्लिम, सरकार आणि आपण सगळ्यांनी आत्मपरिक्षण करण्याची वेळ आली आहे.'
वाचा: सोनाक्षी सिन्हा करणार बॉयफ्रेंड झहीर इक्बालशी लग्न? अभिनेत्रीने स्वत: दिली प्रतिक्रिया
नवे सरकार, नवी सुरुवात आहे. एक भारतीय नागरिक म्हणून तुम्ही देशात कोणते बदल होण्याची अपेक्षा करता? असा प्रश्न नसीरुद्दीन यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी 'मोदींना वेगवेगळ्या टोप्या घालायला आवडतात. मी त्यांना जाळीवाल्या टोपीमध्ये पाहू इच्छितो. मी योग्य मुस्लिम देखील पाहू इच्छीतो. सतत सुरु असलेले हेट स्पीच संपावे अशी माझी इच्छा आहे. मला संसदेत सर्वाधिक महिला पाहायच्या आहेत. मोदींना इतका अहंकार आहे की ते कधीच चूक मान्य करत नाहीत. त्यांनी केवळ एक जेस्चर म्हणून जाळीवाली टोपी घालावी' असे उत्तर दिले.
वाचा: 'हमे हिंदू राष्ट्र चाहिए प्रधानमंत्रीजी,' केतकी चितळेची थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मागणी
एका कार्यक्रमाला मोदींना हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांना मौलविन यांनी टोपी घालायला दिली होती. पण ती टोपी घालायला मोदींनी नकार दिला होता. ही घटना विसरणे कठीण आहे. मोदींनी जर नकार दिला नसता तर ते एक जेस्चर ठरले असते की आपण सर्वजण एक आहोत. हिच गोष्टी त्यांच्याकडून मुस्लिमांना समजवता आली असती.
वाचा: 'मुंज्या' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! चार दिवसात कमावले कोट्यवधी रुपये
संबंधित बातम्या