'रॉकस्टार', 'मैं तेरा हीरो' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारी अभिनेत्री नर्गिस फाखरी नेहमीच चर्चेत असते. सध्या नर्गिस तिच्या चित्रपटांऐवजी खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. नर्गिसची बहिण आलिया फाखरीला मंगळवारी न्यूयॉर्क पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर एक्स बॉयफ्रेंडची हत्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आता हे प्रकरण नेमकं काय आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, नर्गिसने सोशल मीडियावर पोस्ट शेअऱ केली आहे.
नर्गिस गेल्या २० वर्षांपासून तिच्या बहिणीच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिने यावर बोलणे टाळले आहे. दरम्यान, नर्गिसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने, ‘आम्ही तुमच्यासाठी येत आहोत’ असे म्हणत आगामी सिनेमा हाऊसफूल ५चे पोस्टर शेअर केले आहे.
डेली न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, आलियाने न्यूयॉर्कमधील क्वीन्स मधील एका दोन मजली गॅरेजला आग लावली. या आगीत गॅरेजमध्ये असेला तिचा एक्स बॉयफ्रेंड एडवर्ड जेकब्स आणि तिच्या एक्स बॉयफ्रेंडची मैत्रीण अनास्तासिया "स्टार" एटिएन यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पोलिसांनी आलियाला अटक करुन क्वीन्स क्रिमिनल कोर्टात हजर केले आहे. तिचा जामिन नामुंजर करण्यात आला आहे.
डिस्ट्रिक्ट अॅटर्नी मेलिंडा काट्झ यांनी या प्रकरणाबाबत माहिती दिली आहे. "या आरोपीने जाणूनबुजून गॅरेजला आग लावली. या आगीत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपीने लावलेली आग ही पटापट वाढत गेली. वेगाने वाढणाऱ्या आगीत दोघेही अडकले आणि धुरामुळे दोघांचाही मृत्यू झाला" अशी माहिती डिस्ट्रिक्ट अॅटर्नी मेलिंडा काट्झ यांनी दिली आहे.
नर्गिस फाखरीच्या आईने या प्रकरणावर निवेदन जारी केले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, "मला वाटत नाही की ती कोणालाही ठार मारू शकते. ती प्रत्येकाची काळजी घेणारी व्यक्ती आहे. तिने आजवर अनेकांची मदत केली आहे. या प्रकरणी तिला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे."
वाचा: 'कपिल शर्मा शो'मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर
इंडिया टुडेच्या जवळच्या सुत्रांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. नर्गिस गेल्या २० वर्षांपासून तिच्या बहिणीच्या संपर्कात नाही आणि तिला केवळ बातम्यांद्वारे या घटनेची माहिती मिळाली. “ती 20 वर्षांपासून तिच्या बहिणीच्या संपर्कात नाही. इतर सर्वांप्रमाणेच अभिनेत्रीलाही बातमीद्वारे या घटनेची माहिती मिळाली," अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नर्गिस फाखरी लवकरच 'हाऊसफुल ५' या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ६ जून २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात संजय दत्त, रितेश देशमुख, अभिषेक बच्चन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. त्यामुळे सर्वजण या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत.
संबंधित बातम्या