Vanvaas Box Office Collection Day 1: 'गदर २' सिनेमाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी अभिनेते नाना पाटेकर आणि मुलगा उत्कर्ष शर्मा यांना घेऊन 'वनवास' हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नानांनी या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. आता. या चित्रपटाने आता पहिल्या दिवशी किती कमाई केली? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया...
शुक्रवारी, चित्रपटगृहांमध्ये बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने आवाज दिलेला 'मुफासा' हा चित्रपट 'वनवास' सिनेमासोबतच प्रदर्शित झाला. तसेच अल्लू अर्जुनचा 'पुष्पा २' देखील अजून चित्रपटगृहांमध्य धरुन आहे. त्यामुळे नाना आणि उत्कर्ष यांचा 'वनवास' हा सिनेमा पहिल्यादिवशी हिट ठरला की फ्लॉप हे जाणून घेण्यासाठी सर्वजण आतुर आहेत. त्यामुळे चला जाणून घेऊया वनवास या चित्रपटाने पहिल्या दिवशी किती कमाई केली आहे.
उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर यांच्या 'वनवास' या चित्रपटाने पहिल्या दिवशी रात्री साडेदहा वाजेपर्यंत ६० लाखांची कमाई केली आहे. तसेच सेकनिल्कवर उपलब्ध असलेली ही आकडेवारी अंतिम नसल्याचे सांगितले आहेत. तर अंतिम आकडेवारी आल्यानंतर त्यात फेरबदल केले जाऊ शकतात. कोइमोईच्या अंदाजानुसार वनवास हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २ कोटी पेक्षा कमी कलेक्शन करू शकला आहे. तर पिंकविलाच्या रिपोर्टनुसार हा चित्रपट १ कोटींचा व्यवसाय करू शकतो असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आतापर्यंतची कमाई पाहता निराशा पाहायला मिळालेली आहे.
वाचा: अभिनेत्याच्या मृत्यूला पत्नीने नाना पाटेकरांना ठरवले होते जबाबदार, नेमकं काय घडलं होतं?
अल्लू अर्जुनचा पुष्पा २ अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून या चित्रपटाने एक हजार कोटींची कमाई केली आहे. आणि अजूनही कमाईमध्ये पुष्पा २ दुहेरी आकडा ओलांडत आहे. त्याचबरोबर हॉलिवूड चित्रपट मुफासानेही पहिल्या दिवशी दहा कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या दोन सिनेमांसमोर वनवास हा फ्लॉप ठरत आहे. पहिल्या दिवशी सिनेमाने अगदीच कमी कमाई केली आहे.
संबंधित बातम्या