मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  एका दिवसांत ६० सिगरेट प्यायचे नाना पाटेकर! चेन स्मोकर असलेल्या अभिनेत्याने कसे सोडले व्यसन?

एका दिवसांत ६० सिगरेट प्यायचे नाना पाटेकर! चेन स्मोकर असलेल्या अभिनेत्याने कसे सोडले व्यसन?

Jun 25, 2024 04:29 PM IST

एकेकाळी नाना पाटेकर हे चेन स्मोकर होते. त्यांना सिगरेटचं इतकं व्यसन होतं की, दर दिवशी ते जवळपास ६० सिगरेट ओढायचे.

एका दिवसांत ६० सिगरेट प्यायचे नाना पाटेकर! चेन स्मोकर असलेल्या अभिनेत्याने कसे सोडले व्यसन?
एका दिवसांत ६० सिगरेट प्यायचे नाना पाटेकर! चेन स्मोकर असलेल्या अभिनेत्याने कसे सोडले व्यसन?

आपल्या दमदार अभिनयाने मराठीच नव्हे तर बॉलिवूड मनोरंजन विश्व गाजवणारे अभिनेते म्हणून नाना पाटेकर यांचे नाव घेतले जाते. नाना पाटेकर यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मनोरंजन विश्वाला दिले आहेत. त्यांचे नाव नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असते. नुकतीच त्यांनी एका वेब पोर्टलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी सगळ्या चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. यात त्यांनी आपल्या आयुष्यातील एक खाजगी गोष्ट देखील सांगितली. एकेकाळी नाना पाटेकर हे चेन स्मोकर होते. त्यांना सिगरेटचं इतकं व्यसन होतं की, दर दिवशी ते जवळपास ६० सिगरेट ओढायचे. पण त्यांचे हेच व्यसन कसे सुटले, याबाबत त्यांनी खुलासा केला आहे.

साधं राहणीमान, सामान्य लोकांची मदत आणि प्रत्येकाविषयी आपुलकी अशी नाना पाटेकर यांची ओळख आहे. आपल्या बिनधास्त आणि बेधडक वक्तव्यांमुळे देखील नाना पाटेकर नेहमीच चर्चेत असतात. जे आहे ते अगदी स्पष्ट शब्दांत, कुणाचीही भीती न बाळगता व्यक्त करणं हा नाना पाटेकर यांचा स्वभाव आहे. नुकतीच नाना पाटेकर यांनी ‘लल्लन टॉप’च्या युट्युब वाहिनीला दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे. यात त्यांनी अनेक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या व्यसनाबद्दलही सांगितले. धूम्रपानाच्या व्यसनाबद्दल सांगताना नाना पाटेकर म्हणाले की, ‘मला सिगरेट ओढण्याचे भयंकर व्यसन होते. अगदी अंघोळीला गेली तरी मी सिगरेट ओढायचो.’

Bigg Boss OTT 3: ‘बिग बॉस ओटीटी ३’मध्ये पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांना बसणार शॉक! कोण होणार बेघर?

दिवसाला ६० सिगरेट!

आपल्या या व्यसनाबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले की, ‘त्यावेळी मी दिवसाला जवळपास ६० सिगरेट ओढायचो. सिगरेटच्या भपकाऱ्यामुळे कुणीही माझ्या गाडीत देखील बसायचे नाही. मी कधीच दारूला हात लावला नाही. पण, धूम्रपानाची सवय जडली होती. अशातच एक दिवस बहिणीचे काही शब्द कानावर पडले आणि माझं हे व्यसन देखील कायमचं सुटलं.’

ट्रेंडिंग न्यूज

कसं सुटलं व्यसन?

आपलं व्यसन कसं सुटलं याबद्दल सांगताना नाना म्हणाले की, ‘त्यावेळी माझ्या बहिणीने तिचा एकुलता एक मुलगा गमावला होता. याच दरम्यान एक दिवशी सिगरेट ओढल्यानंतर मी खोकू लागलो, ते बहिणीने पाहिलं. मला खोकताना पाहून ती म्हणाली की, अजून आयुष्यात काय काय बघावं लागणार आहे काय माहित... तिचे हेच शब्द जिव्हारी लागले.’ बहिणीचे हेच बोल मनाला लागल्यामुळे त्या दिवसापासून नाना पाटेकर यांनी सिगरेट सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते सिगरेटचं व्यसन सोडण्यात यशस्वी देखील झाले.

WhatsApp channel