बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून नाना पाटेकर हे ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. पण सध्या ते फारसे इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसल्याचे पाहायला मिळते. आता त्यांचा एक नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची घोषणा करुन नवे पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे पोस्टर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळत आहे.
नाना पाटेकर यांच्या आगामी चित्रपटाचे नाव 'वनवास' असे आहे. एक प्रेम कथा, अपने आणि गदर २ यांसारख्या ब्लॉकबस्टर सिनेमे देणारे अनिल शर्मा यांनी 'वनवास' या चित्रपटाची निर्माती केली आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकताच लाँच करण्यात आले आहे. या पोस्टरवरील नाना पाटेकर यांचा लूक पाहण्यासारखा आहे. पोस्टरवरील फोटोमध्ये नाना पाटेकरांच्या हाचाच बॅग, डोक्यावर टोपी, शर्ट आणि गळ्यात टाय घातली आहे. नाना यांचा हा लूक पाहून ते कामावरून येत असल्याचे जाणवत आहे. आता चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
‘वनवास’ ही एक चित्तवेधक कथा आहे, ज्याची संकल्पना ही कालातीत आहे. एका प्राचीन कथेचा प्रतिध्वनी या कथेतून व्यक्त होतो, ज्यात कर्तव्य, सन्मान आणि एखाद्याच्या कृतींचे परिणाम जीवनाचा आगामी मार्ग निश्चित करतात. चित्रपटाकडून असलेल्या वाढत्या अपेक्षेदरम्यान, निर्मात्यांनी अखेर हा चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख निश्चित केली आहे. समाजमाध्यमांवर या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘वनवास’ प्रदर्शित होण्याची तारीख जाहीर केली.
वाचा: प्रसिद्ध अभिनेत्रीचा खासगी MMS लीक, १७ सेकंदांच्या व्हिडीओने माजली खळबळ
अनिल शर्मा लिखित, निर्मित आणि दिग्दर्शित ‘वनवास’ हा चित्रपट ‘झी स्टुडिओज’द्वारे जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे. हा चित्रपट २० डिसेंबर रोजी दाखल होणार आहे. ‘वनवास’ या चित्रपटाची कथा चित्तवेधक आणि खिळवून ठेवेल अशी आहे. या चित्रपटात नाना पाटेकर आणि गदर २ मधील भूमिकेकरता नावाजलेले गेलेले उत्कर्ष शर्मा दिसणार आहेत.
संबंधित बातम्या