अनेकदा सिनेमा पाहताना आपण त्यातील पात्राशी प्रसंगांशी स्वतःला जोडून घेतो. त्या पत्रासोबत होणाऱ्या भावनिक किंवा दु:खी करणाऱ्या प्रसंगासोबत आपण देखील भावुक होतो. सर्वमसामान्य प्रेक्षकांची अशी भावना असेल तर अभिनय करणाऱ्या अभिनेत्याच्या कुटुंबीयांच्या काय भावना असतील? याचा अनुभव अभिनेता नाना पाटेकर यांना आपल्या कारकिर्दीचा सुरुवातीचा काळातच आला.
नाना पाटेकर यांनी १९७९ साली जब्बार पटेल दिग्दर्शित 'सिंहासन' या चित्रपटात व्हिलनची भूमिका साकारली होती. या चित्रपटातअरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले यासारखे मातब्बर कलाकार झळकले होते. या चित्रपट अजून एक प्रतिभावान कलाकार होता ज्याचं नाव होत जयराम हर्डीकर. या चित्रपटात जयराम यांनी कुटुंबावर प्रेम असलेला, त्यांच्या सुखासाठी स्मगलरच्या टोळीसाठी काम करणाऱ्या पानितकर या तरुणाचे पात्र त्यांनी साकारलं होत. या चित्रपट नानांनी त्यांचा साथीदाराची भूमिका साकारली होती. चित्रपटाचा शेवटी नाना पाटेकर हे जयराम यांची हत्या करतात.
मात्र, दुर्दैव असे की १९७९ साली चित्रपट रिलीज झालेचा काही महिन्यातच जयराम हर्डीकर यांचे एका अपघातात निधन झाले. मात्र आपल्या पतीच्या या अकस्मात निधनाचा जयराम यांचा पत्नीला जबर धक्का बसला. त्यांनी कुठंतरी या घटनेला सिहांसन चित्रटातील त्यांचा मृत्यूला जोडले. त्यांनी नाना पाटेकर यांना त्यांच्या मृत्याला जबाबदार ठरवले. नानांनी चित्रपटात जयराम यांचा खून केला. म्हणून अपशकुन झाला. असा त्यांचा समज झाल्याने त्यांनी अनेक वर्ष नाना पाटेकर यांच्याशी बोलणे बंद केले होते. मात्र कालातंराने कित्येक वर्षानंतर त्यांची नानांसोबत भेट झाली आणि त्यांनी तो राग विसरून नानांशी मनमोकळेपणाने बोलल्या. असे खुद्द नाना यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
'मंतरलेली चैत्रवेल' टीमच्या बसचा कोल्हापूरच्याच दौर्यावर असताना इस्लामपूरजवळ झालेल्या अपघातात जयराम हर्डिकरांचा चटका लावणारा मृत्यू झाला. असे सांगितले जाते कि अपघातानंतर बसने पेट घेतला. पेटलेल्या बसमधून जयराम सुखरूप बाहेरआले होते. मात्र ज्येष्ठ अभिनेत्री शांताबाई जोग या बसमध्ये अडकल्याचे समजल्यावर परत त्या बसमध्ये त्यांनी धाव घेतली होती व त्यांना वाचविण्याच्या प्रयत्नात दोघेही जळून गेले.
वाचा: दादा कोंडकेंना ‘सासरचं धोतर’ या सिनेमाची कशी सुचली कथा? वाचा भन्नाट किस्सा
जयराम हर्डीकर मराठी रंगभूमीवरील एक मोठं नाव होत. आरोप, मंतरलेली चैत्रवेल यासारख्या नाटकांमधुन त्यांनी भुमिका साकारल्या. सिंहासन, सर्वसाक्षी, २२ जुन १८९७, सर्वसाक्षी या चित्रपटांत ते झळकले. जयराम यांची मुलगी संज्योत हर्डीकर या देखील एक उत्तम अभिनेत्री असून बेधुंद मनाची लहर’, ‘आभाळमाया’, ‘या गोजिरवाण्या घरात’ या गाजलेल्या मालिकांसोबतच ‘सावरखेड एक गाव’ या सिनेमात अभिनय केला आहे. जयराम यांची पत्नी शांभवी हर्डीकर यांनी पतीच्या आठवणींवर ‘तुझ्याशीच बोलत्येय मी…’. २०१३ साली हे पुस्तक प्रकाशित केले
संबंधित बातम्या