मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  'आजारी मुलाचा तिरस्कार वाटू लागला होता', नाना पाटेकरांनी केले आयुष्यातील कठीण काळावर भाष्य

'आजारी मुलाचा तिरस्कार वाटू लागला होता', नाना पाटेकरांनी केले आयुष्यातील कठीण काळावर भाष्य

Aarti Vilas Borade HT Marathi
Jun 23, 2024 09:08 AM IST

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेते नाना पाटकेर यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचा मृत्यू कसा झाला हे सांगितले आहे. तसेच त्यांच्या मनात त्यावेळी कोणते विचार आले होते हे देखील त्यांनी मांडले.

nana patekar: नाना पाटेकर
nana patekar: नाना पाटेकर

बॉलिवूड इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेते म्हणून नाना पाटेकर हे ओळखले जातात. त्यांनी आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. पण सध्या ते फारसे इंडस्ट्रीमध्ये सक्रिय नसल्याचे पाहायला मिळते. नाना हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी देखील ओळखले जातात. पण नाना हे वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलताना क्वचितच दिसले असतील. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नानांनी पत्नीसोबतची पहिली भेट, मोठ्या मुलाचे निधन आणि बहिणीने सांगितलेली गोष्ट या सगळ्यावर जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मुलाच्या निधनाने बसला होता धक्का

नाना पाटेकर यांनी 'लल्लनटॉप'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक मोठे खुलासे केले. नानांनी सांगितले की मोठ्या मुलाच्या जन्मापासून तो कसा अडचणीत होता आणि शेवटी त्याने काही वर्षांनी जगाचा निरोप घेतला. त्याच्या एका डोळ्याची समस्या होती. याविषयी बोलताना नाना म्हणाले, 'एक काळ असा आला होता की मी मुलाचा तिरस्कार करु लागलो होतो. त्याला पाहिल्यावर मला वाटायचे की लोक काय बोलत असतील? नानांचा हा मुलगा कसा आहे? असा विचार ते करत असतील. पण माझ्या अशा वागण्यामुळे त्याला काय वाटतं याचा मी विचारच केला नव्हता.'
वाचा: 'रेखाकडे असे काय आहे जे माझ्याकडे नाही', शबाना आझमी यांनी दिग्दर्शकाला विचारला होता प्रश्न

वाचा: पाच जन्मातील बायका एकाच जन्मात! स्वप्नील जोशीच्या 'बाई गं'चा टीझर चर्चेत

मुलाच्या निधनाविषयी नानांनी सांगितले

'लोक माझ्या मुलाबद्दल काय विचार करतील याचा मी नेहमी विचार करत आलो. आम्ही त्याचे नाव दुर्वास ठेवले होते. त्यांने आमच्यासोबत अडीच वर्षे घालवली. पण तुम्ही काय करू शकता. आयुष्यातील काही गोष्टी पूर्वनियोजित असतात' असे नाना म्हणाले.
वाचा: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मधील कलाकाराचा १६ वर्षांनी मालिकेला रामराम, चाहत्याची पोस्ट

बहिणीने दिला होता नानांना सल्ला

"एक काळ असा होता जेव्हा मी दिवसाला ६० सिगारेट ओढायचो. अंघोळ करतानाही हातात सिगारेट असायची. सिगारेटच्या धुराच्या दुर्गंधीने भरलेली गाडी असल्याने लोकांना गाडीत बसायची इच्छा नव्हती. पण बहिणीच्या एका ओळीने माझ्या या वाईट सवयीला पूर्णविराम लागला. माझ्या बहिणीने तिचा एकुलता एक मुलगा गमावला होता. त्यानंतर तिने मला धूम्रपान केल्यानंतर खोकताना पाहिले. तेव्हा ती मला म्हणाली 'तुला अजून काय बघायचे आहे' त्यानंतर मी कधीही सिग्रेटला हात लावला नाही" असे नाना म्हणाले.

WhatsApp channel