Nana Patekar Son Malhar : अभिनेते नाना पाटेकर हे मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध कलाकार आहेत. नाना पाटेकर अभिनय आणि संवाद शैलीसाठी विशेष ओळखले जातात. ते इंडस्ट्रीतील असे अभिनेते आहेत, ज्यांची गणना नाराज कलाकारांमध्येही केली जाते. अलीकडेच त्याने एका मुलाखतीत खुलासा केला की, ते आधी खूपच रागीट होते आणि त्यांनी अनेकांना मारहाण केली होती. ते असेही म्हणाले होते की, ते अभिनेते नसते, तर अंडरवर्ल्डमध्ये नक्कीच असते.
नाना पाटेकर म्हणाले की,पुढे अभिनय हा माझा राग काढण्याचा मार्ग बनला. पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित नाना पाटेकर यांचाही बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नाना पाटेकर ५५ कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक आहेत. कोट्यवधींची संपत्ती असूनही नाना पाटेकर अतिशय साधी जीवनशैली जगतात. नाना पाटेकर यांचे लग्न अभिनेत्री आणि बँक अधिकारी नीलकांती पाटेकर यांच्याशी झाले होते. या दोघांना मल्हार पाटेकर नावाचा मुलगा आहे. मल्हारच्या आधी त्यांना आणखी एक मोठा मुलगा होता. पण, काही आकस्मिक कारणाने त्याचा मृत्यू झाला.
आता नाना पाटेकर यांना मल्हार पाटेकर हा एकच मुलगा आहे. मल्हारला त्याच्या वडिलांसारखा साधेपणा आवडतो. याशिवाय तो दिसायलाही नाना पाटेकर यांच्यासारखाच आहे. बरेच लोक त्याला वडिलांची कार्बन कॉपी म्हणतात. मल्हारच्या शिक्षणाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने सरस्वती मंदिर हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मल्हारने वाणिज्य शाखेत पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. मल्हारला लहानपणापासूनच चित्रपटात यायचे होते. मात्र, त्याने अभिनयात नाही तर, दिग्दर्शनात करिअर करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला मल्हार प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करणार होता, पण याच दरम्यान नाना आणि प्रकाश झा यांच्यात भांडण झाल्यामुळे मल्हारने प्रकाश झा यांच्या चित्रपटात काम करण्यास नकार दिला होता.
मल्हार पाटेकरने राम गोपाल वर्मा यांच्या 'द अटॅक ऑफ २६/११' या चित्रपटाद्वारे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून इंडस्ट्रीत पदार्पण केले. सध्या तो स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस चालवतो. ज्याचे नाव त्याने आपल्या वडिलांच्या नावावर ठेवले आहे. 'नाना पाटेकर प्रॉडक्शन हाऊस' असे या प्रॉडक्शन हाऊसचे नाव आहे.
संबंधित बातम्या