Nana Patekar : 'त्याच्या कानाखाली मारणं ही माझी चूकच होती', नाना पाटेकर यांना कसला पश्चात्ताप होतोय?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Nana Patekar : 'त्याच्या कानाखाली मारणं ही माझी चूकच होती', नाना पाटेकर यांना कसला पश्चात्ताप होतोय?

Nana Patekar : 'त्याच्या कानाखाली मारणं ही माझी चूकच होती', नाना पाटेकर यांना कसला पश्चात्ताप होतोय?

Dec 05, 2024 05:32 PM IST

Nana Patekar Realize Mistake : नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये अभिनय करून चाहत्यांच्या मनावर छाप सोडली आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी नाना पाटेकर यांनी आपल्या एका चाहत्याला थप्पड मारली होती.

नाना पाटेकर
नाना पाटेकर

Nana Patekar Realize His Mistake : बॉलिवूड अभिनेता नाना पाटेकर काही दिवसांपूर्वी वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. काही महिन्यांपूर्वी नाना पाटेकर आपल्या चित्रपटाचं शूटिंग करत होते. त्यावेळी एक चाहता त्यांच्याकडे सेल्फी काढण्यासाठी आला होता. तेव्हा नाना यांनी त्या चाहत्याच्या कानाखाली मारली होती. नाना पाटेकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर नाना पाटेकर वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. आता नाना पाटेकर यांनी एका मुलाखतीत आपली चूक मान्य केली आहे. चाहत्याला थप्पड मारणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले आहेत.

‘न्यूज १८’शी खास बातचीत करताना नाना पाटेकर म्हणाले की, ‘मागे एक माणूस आला होता, त्याच्यावरून वाद झाला होता. मी त्याला कानाखाली मारली होती, ते माझे चुकलेच होते. तो प्रेमाने माझ्याकडे आला होता. पण, मी शॉटच्या शूटिंगमध्ये होतो हे त्याला माहित नव्हते. तो शॉटच्या मधोमध येऊन सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रागाच्या भरात मी त्याला थप्पड मारली, जी चुकीची होती. पण कुणावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक जागा असते. मी शॉट संपवल्यावर तो आला असता, तर मला अडचण आली नसती. पण त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.’

काय होता ‘हा’ वाद?

काही महिन्यांपूर्वी बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर बनारसमध्ये आपल्या चित्रपटाचे शूटिंग करत होते. त्यावेळी शूटिंग सुरू असतानाच सेटवर एक व्यक्ती आली आणि त्याने शॉटच्या मध्यात शिरून नाना पाटेकर यांच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला. नानांना हे आवडलं नाही आणि त्यांनी त्या माणसाला थप्पड मारली. नाना पाटेकर यांचे हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाले आणि त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नानांनी त्या चाहत्याची माफी मागितली होती.

कधी प्रदर्शित होणार नाना पाटेकर यांचा चित्रपट?

नाना पाटेकर यांचा हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार असून, ज्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ही घटना घडली, त्या चित्रपटाचे नाव ‘निर्वासन’ आहे. हा चित्रपट २० डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. झी स्टुडिओजच्या बॅनरखाली हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन अनिल शर्मा यांनी केले आहे.

Whats_app_banner