
अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या वादग्रस्त व्यक्तामुळे कामयच चर्चेत असतात. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ आणि ‘गदर २’ सारखे चित्रपट मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत हे त्रासदायक आहे, असे वक्तव्य करत सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यावर ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचा दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीने प्रत्युत्तर देत नाराजी व्यक्त केली होती. आता यावर नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया देत नाराजी व्यक्त केली आहे.
नाना पाटेकर यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नसीर यांच्या वक्तव्यावर मत मांडत टोला लगावला आहे. “तुम्ही नसीर यांना विचारले होते का की त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे काय? माझ्या मते, राष्ट्रावर प्रेम दाखवणे हा राष्ट्रवाद आहे आणि ती वाईट गोष्ट नाही. गदर हा चित्रपट ज्या प्रकारचा आहे, त्यात तसा आशय असेल आणि मी द केरला स्टोरी पाहिला नाही, त्यामुळे मी त्यावर भाष्य करू शकत नाही,” असे नाना म्हणाले.
वाचा: विशाखा सुभेदारने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ का सोडला? कारण आले समोर
पुढे ते म्हणाले, “राष्ट्रवादाच्या नावाखाली लोकांनी पैसे कमावणे योग्य नाही, सत्य घटनांवर चित्रपट बनवताना त्यांनी वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे.” नाना पाटेकर यांचा 'द व्हॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्रीने केले आहे. या चित्रपटात ते कोवॅक्सिनचा शोध लावणाऱ्या टीमचे प्रमुख डॉ. बलराम भार्गव यांची भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
“मी ‘द केरला स्टोरी’ किंवा ‘गदर २’सारखे चित्रपट पाहिलेले नाहीत. पण त्यात नेमके काय दाखवले जात आहे ते मला चांगलेच ठाऊक आहे. ही फार चिंताजनक बाब आहे की ‘द काश्मीर फाइल्स’सारखे चित्रपट हिट होत आहेत, पण सुधीर मिश्रा, अनुभव सिन्हा, हंसल मेहता यांचे चित्रपट प्रेक्षक पाहत नाहीत. त्यामुळे या दिग्दर्शकांनी या गोष्टींमुळे न डगमगता त्यांचे चित्रपट लोकांसमोर आणायला पाहिजेत असे मला वाटते”
संबंधित बातम्या
