Nana Patekar Reaction on Politics: बॉलिवूडमधील मराठमोळे अभिनेते नाना पाटेकर हे राजकारणात एण्ट्री करणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जोर आला आहे. यावर नाना पाटेकर हे सतत प्रतिक्रिया देखील देताना दिसत आहे. नुकत्याच एका कार्यक्रमात नानांनी 'मी कुठून निवडणूक लढवू हे तुम्हीच मला सांगा' असा सवाल केला आहे. नेमकं नाना काय म्हणाले चला जाणून घेऊया...
अभिनेता नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी नुकताच मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी अनेक गोष्टींवर वक्तव्य केले. यावेळी मकरंद अनासपुरे म्हणाले, 'निसर्गाचे भाकीत आपण करु शकत नाही. दुष्काळ हटविण्यासाठी शासनस्तरावरुन प्रयत्न होत आहेत. मात्र एक एनजीओ म्हणून आपली एक वेगळ्या प्रकारची भूमिका असते. हेही लक्षात घ्यायला हवे.'
वाचा: राखी सावंतने बुरख्याच्या आत बिकिनी घातली अन्...; फराह खानने सांगितला मजेशीर किस्सा
पुढे ते म्हणाले की, 'नाम फाउंडेशनला आता ९ वर्षे पूर्ण होतील. त्या निमित्तानं सांगावं वाटतं की, नाम फाउंडेशनने महाराष्ट्रातील एक हजारांहून अधिक गावांमध्ये पाण्याचे काम केले आहे. महाराष्ट्र शासनासोबत काही महत्वांच्या कामांमध्ये सामंजस्य करार करण्यासाठी आम्ही नाम फाउंडेशनच्या वतीने आलो आहोत. आम्हाला यावर्षी ३५० गावांमध्ये काम करायचे आहे. ५० लाख क्युबिक गाळ काढण्याचा निर्धार केला आहे.'
वाचा: मलायकाने घटस्फोट का घेतला? किती घेतली पोटगी? जाणून घ्या
या मुलाखतीबद्दल माध्यमांशी बोलताना नानांनी अखेन मुद्दे मांडले. त्यांना सतत विचारण्यात आलेल्या राजकारणाशी संबंधीत प्रश्नाचे देखील सडेतोड उत्तर दिले आहे. 'मी कुठून निवडणूक लढवू हे तुम्हीच मला सांगा. राजकारण हे काही माझे पिंड नाही. जर मी राजकारण प्रवेश केला तर सध्या हाती घेतलेली कामे पूर्ण करता येणार नाही. मला खूपदा मी अनेक ठिकाणाहून निवडणूक लढवणार आहे असे बाहेरुनच कळले आहे. पण राजकारण हा माझा प्रांत नाही. मी आता जे काम करतो आहे त्याचे समाधान मला राजकारणातून मिळेल का, मनात जे येईल ते आपण बोलून टाकतो, त्यामुळे मला नाही वाटतं की, मला तिकडे जाता येईल' असे परखड मत नानांनी मांडले. आता त्यांच्या राजकरणात प्रवेश करणाच्या चर्चांवर पूर्णविराम आला आहे.
वाचा: ‘बिग बॉस’ फेम अभिनेत्री लग्नासाठी दुबईत गेली अन् तरुंगात पोहोचली; काय झालं नेमकं जाणून घ्या
अभिनेते नाना पाटेकर यांचा ‘ओले आले’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यापूर्वी त्यांचा वॅक्सिन वॉर चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता नाना पाटेकर कोणत्या चित्रपटात दिसणार? याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या