नाना पाटेकर हे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील असे अभिनेते आहेत ज्यांनी फक्त आपल्या आवाजाच्या आणि संवाद फेकीच्या कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले. नानांना त्यांच्या अनोख्या अभिनय शैलीसाठी अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले. इतर अभिनेत्यांसारखा रेखीव चेहरा नसताना देखील फक्त अभिनयाच्या जोरावर ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर पुरस्कार विजेते ठरले. प्रत्येक वयातील प्रेक्षक हा नानांचा चाहता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का नाना पाटेकर यांनी पत्नीला घटस्फोट न देताच वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामागे काय कारण आहे? चला जाणून घेऊया...
नाना पाटेकर हे रायगडमध्ये राहणाऱ्या एका मराठी कुटुंबात १ जानेवारी १९५१ रोजी जन्माला आले. त्यांचे खरे नाव विश्वनाथ पाटेकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव दिनकर पाटेकर होते. त्यांची आई संजनाबाई पाटेकर गृहिणी होत्या. नाना पाटेकर यांना अशोक आणि दिलीप पाटेकर असे दोन भाऊ आहेत. वयाच्या २७व्या वर्षी नाना पाटेकरांनी निलकांतीशी लग्न करुन संसार थाटला. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. नाना यांनी इतकी भांडणे झाल्यानंतरही पत्नीला घटस्फोट देण्याऐवजी तिच्यापासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला.
वाचा: डिसेंबरमध्ये 'या' सीरिज होणार ओटीटीवर प्रदर्शित, वाचा यादी
समोर आलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांचे अनेक अभिनेत्रींसोबत प्रेम संबंध होते. ते कळाल्यावर निलकांती यांनी नानांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. एककाळ असा होता, जेव्हा फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर, चाहत्यांमध्ये देखील अभिनेत्री मनिषा कोईराला आणि नाना पाटेकर यांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या होत्या. नाना पाटेकर यांच्या अफेअरबद्दल कळल्यानंतर निलकांती घर सोडून गेल्या. अनेकदा नानांनी या सगळ्या अफवा आहेत असे सांगितले होते.
निलकांती या देखील अभिनेत्री होत्या. रंगमंचावर नाना आणि त्यांची ओळख झाली होती. निलकांती या बँकेत देखील काम करत होत्या. त्यांना २ हजार ५०० रुपये पगार होता. अनेकदा त्यांच्या पगारावर घर चालत असे. नाना आणि निलकांती यांना एक मुलगा आहे. त्याचे नाव मल्हार असे आहे. त्याच्यामुळे नानांनी कधीही पत्नीला घटस्फोट दिला नाही असे म्हटले जाते.
संबंधित बातम्या