मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Housefull 5 Movie: उदय शेट्टी-मजनू भाईची जोडी पुन्हा जमणार! अक्षय कुमारच्या ‘वेलकम ५’मध्ये ‘या’ अभिनेत्यांची एन्ट्री

Housefull 5 Movie: उदय शेट्टी-मजनू भाईची जोडी पुन्हा जमणार! अक्षय कुमारच्या ‘वेलकम ५’मध्ये ‘या’ अभिनेत्यांची एन्ट्री

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 12, 2024 08:44 AM IST

Nana Patekar-Anil Kapoor in Housefull 5: अक्षय कुमारच्या ‘वेलकम’ या चित्रपटात अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या जोडीला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली होती.

Nana Patekar-Anil Kapoor in Housefull 5
Nana Patekar-Anil Kapoor in Housefull 5

Nana Patekar-Anil Kapoor in Housefull 5: बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला सध्या आपल्या आगामी 'हाऊसफुल ५' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाबाबत रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. यावेळीही पुन्हा असाच काहीसा प्रकार चित्रपटात घडला आहे. चित्रपटातील कलाकारांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. आता दिग्दर्शकांनी या चित्रपटात आणखी दोन कलाकारांची एन्ट्री केली आहे. यामुळे आता प्रेक्षकांना मनोरंजनाचा आणि विनोदाचा डबल डोस मिळणार आहे.

‘हाऊसफुल ५’ या चित्रपटातील दोन मुख्य कलाकार अक्षय कुमार आणि रितेश देशमुख यांची नावं सर्वात आधी समोर आली होती. आता पिपिंग मूनच्या रिपोर्टनुसार, दिग्दर्शकाने ‘वेलकम’ फ्रँचायझीच्या टीमला ‘हाऊसफुल’ फ्रँचायझीमध्ये सामील करून होण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता ‘वेलकम’ फ्रँचायझी टीम अक्षय कुमार, नाना पाटेकर आणि अनिल कपूर ‘हाऊसफुल ५’मध्ये रितेश देशमुखसोबत झळकणार आहेत. अक्षय कुमारच्या ‘वेलकम’ या चित्रपटात अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्या जोडीला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली होती.

Dhirajlal Shah Passed Away: प्रसिद्ध निर्माते धीरजलाल शाह यांचे निधन; कोरोनामुळे घेतला अखेरचा श्वास

तनुश्री दत्ताच्या आरोपांमुळे झाली होती नाना पाटेकरांची गच्छंती!

‘वेलकम’ या चित्रपटात अभिनेता अनिल कपूर याने ‘मजनू भाई’ची भूमिका साकारली होती. तर, ‘उदय शेट्टी’च्या भूमिकेत नाना पाटेकर दिसले होते. यापूर्वी ‘हाऊसफुल ४’साठी देखील नाना पाटेकर यांनाही कास्ट करण्यात आले होते. पण, त्यानंतर तनुश्री दत्ताने त्यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे त्यांचे नाव या यादीतून काढून टाकण्यात आले होते. त्यावेळी नाना पाटेकर यांच्या जागी अभिनेता राणा दग्गुबती याला घेण्यात आले होते.

कधी रिलीज होणार चित्रपट?

मीडिया रिपोर्टनुसार, आता ‘वेलकम’ फ्रँचायझीचा ‘आखरी पास्ता’ म्हणजेच चंकी पांडे देखील या चित्रपटातील सहभागा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. आगामी ‘वेलकम टू द जंगल’बद्दल बोलत असताना फिरोज नाडियादवाला यांनी अक्षय कुमारच्या वाढदिवसानिमित्त ‘वेलकम’ सीरिजच्या आगामी भागाची घोषणा करताना हा चित्रपट यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले आहे. तर, ‘हाऊसफुल’ देखील भारतीय मनोरंजन विश्वातील काही यशस्वी कॉमेडी फ्रँचायझींपैकी एक आहे. 'हाऊसफुल ५'चे दिग्दर्शन 'दोस्ताना'चे दिग्दर्शक तरुण मनसुखानी करणार आहेत. चित्रपटाची रिलीज डेट ६ जून २०२५ असल्याचे सांगण्यात येत आहे.

WhatsApp channel