‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे नम्रता संभेराव. तिने आपल्या विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता एका वेगळ्या कारणामुळे नम्रता चर्चेत आहे. तिला पाडव्याची दिवशी काय भेट मिळाली याची चर्चा रंगली आहे. चला जाणून घेऊया नम्रताला काय भेट मिळणार...
दिवाळी पाडवा जवळ आली की घरच्या नवरे मंडळीत एक वेगळीच चर्चा रंगते, बायकोला पाडव्याला काय गिफ्ट द्यावे याची. अभिनेत्री नम्रता संभेरावला तिच्या नवऱ्याने यंदा भारी गिफ्ट दिले आहे. त्यामुळे नम्रता सध्या चांगलीच खुश आहे. तुम्हाला ही उत्सुकता असेलच की, असे काय गिफ्ट आहे की ज्यामुळे नम्रताचा यंदाचा पाडवा विशेष ठरणार आहे. ८ डिसेंबरला नम्रताचा ‘एकदा येऊन तर बघा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात योगेश संभेराव म्हणजेच नम्रताचा नवरा एका छोटेखानी भूमिकेत दिसणार आहे. आता रील लाईफमध्ये हे कपल एकत्र झळकणार असल्याने रिअल टू रील हा प्रवास नम्रताला विशेष आनंद देणारा आहे यात शंका नाही.
वाचा: कांचन आजीने पाहिले आरोहीच्या लग्नासाठी स्थळ, काय होणार पुढे?
८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाची निर्मिती परितोष पेंटर, राजेशकुमार मोहंती, दिपक कृष्ण चौधरी, सेजल दिपक पेंटर यांची असून सहनिर्मिती अश्विन पद्मनाभन, सत्यनारायण मूरथी,डॉ.झारा खादर यांची आहे. लेखक अभिनेता प्रसाद खांडेकर 'एकदा येऊन तर बघा' या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शकीय पदार्पण करीत आहे. सयाजी शिंदे, भाऊ कदम,विशाखा सुभेदार,गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव,ओंकार भोजने राजेंद्र शिसातकर वनिता खरात, शशिकांत केरकर, रोहित माने,सुशील इनामदार आदि कलाकारांची भली मोठीफौज चित्रपटात आहे.